29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणसाहेब...गर्लफ्रेंड मिळत नाही! राजूराच्या मज्नूचे काँग्रेस आमदाराला पत्र

साहेब…गर्लफ्रेंड मिळत नाही! राजूराच्या मज्नूचे काँग्रेस आमदाराला पत्र

Google News Follow

Related

आपल्या देशात राजकीय पुढाऱ्यांना वाटेल ती कामे सांगण्याच्या घटना काही नवीन नाहीत. अशीच एक घटना महाराष्ट्रात नुकतीच घडली आहे. गर्लफ्रेंड पाहिजे म्हणून थेट आमदार साहेबांना पत्र लिहिण्याचा हा प्रकार राजुरा येथे घडला आहे. राजुराच्या या गर्लफ्रेंडसाठी उत्सुक असलेल्या मज्नूचे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजते आहे.

भूषण राठोड असे या तरुणाचे नाव असून त्याने राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे. प्रयत्न करूनही आपल्याला मुलगी भाव देत नाही अशी खंत या तरुणाने या पत्रातून व्यक्त केली आहे. तालुक्यात भरभरून मुली असूनही मला एकही गर्लफ्रेंड नसणे ही चिंतेची बाब आहे असे या तरुणाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

हे ही वाचा:

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला भाजपाची जोरदार चपराक

लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत

अमरिंदर म्हणतात, शेतकरी आंदोलन पंजाबात नको, तिकडे दिल्लीत करा!

या पात्रातील मजकूर खालील प्रमाणे आहे

प्रती आमदार साहेब, विधानसभा क्षेत्र राजुरा
विषय – गर्लफ्रेण्ड न पटण्या बाबत
अर्जदार – भूषण जांबुवंत राठोड
महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा
आपला प्रेमी
भूषण जांबुवंत राठोड

तर राजुराचे आमदार धोटे यांनी या विषयी बोलताना सांगितले की तो मला प्रत्यक्ष भेटला तर आमदार म्हणून त्याचे नेमके दुःख काय आहे हे मी जाणून घेईन आणि त्याला मदत करायचा नक्की प्रयत्न करेन. पण अशा प्रकारे पत्र लिहून परस्पर ते सोशल मीडियावर व्हायरल करणे योग्य वाटत नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा