27 C
Mumbai
Friday, March 20, 2026
घरक्राईमनामाछत्तीसगडमधील पत्रकार मुकेश हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक

छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक

एसआयटीने हैदराबादमधून घेतलं ताब्यात

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. तीन दिवसांपासून मुकेश बेपत्ता होते आणि त्यांचा शोध घेत असताना त्यांचा मृतदेह हाती लागला. पत्रकार मुकेश यांनी बस्तरमधील १२० कोटी रुपयांच्या रस्ते बांधकाम प्रकल्पातील कथित घोटाळा समोर आणला होता. हा घोटाळा समोर आल्यानंतर सरकारने कंत्राटदाराच्या कारभाराची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर बेपत्ता झालेल्या मुकेश यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी पत्रकार मुकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून हा संशयित फरार होता आणि त्याला आता ताब्यात घेण्यात आले आहे.

बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश चंद्राकर असे आरोपीचे नाव असून त्याला रविवारी रात्री विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने हैदराबादमधून अटक केली आहे. सध्या या प्रकरणी त्याची चौकशी सुरू केली आहे. खाजगी कंत्राटदार सुरेश चंद्राकर याच्या मालमत्तेवरील सेप्टिक टँकमध्ये मुकेश यांचा मृतदेह सापडला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच रितेश चंद्राकर, दिनेश चंद्राकर आणि महेंद्र या तिघांना अटक केली आहे.

छत्तीसगड येथे नुकताच १२० कोटींचा रस्‍ते बांधकामातील घोटाळा उघडकीस आणला गेला होता. हा घोटाळा उघड करणारे पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा ३ जानेवारी रोजी मृतदेह आढळून आला. एका सेप्टीक टँकमध्ये हा मृतदेह सापडला. मुकेश याचा चुलतभाऊ रितेश चंद्राकार याने मृतदेहाची ओळख पटवली होती. पण पोलिसांनी त्यानंतर रितेश याच्यासह तिघांना याप्रकरणातील संशयीत म्‍हणून पकडले. बस्‍तर विभागातील गंगनूर ते हिरोली दरम्‍यान बांधल्‍या जात असलेल्‍या रस्ता कामामध्ये १२० कोटींचा घोटाळा झाला होता. हा घोटाळा पत्रकार मुकेश चंद्राकार यांनी बाहेर काढला होता. या रस्‍त्‍यासाठी ५० कोटीचे टेंडर मंजूर झाले होते. पण याच कामासाठी १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले यासाठी टेंडरमध्ये कोणताही बदल केला गेला नाही. हा प्रकल्प ठेकेदार सुरेश चंद्राकर हाताळत होता. पत्रकार मुकेश यांनी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सरकारने चौकशी सुरु केली आहे. त्‍यामुळे कॉन्ट्रक्‍टर लॉबीमध्ये खळबळ उडाली होती.

हे ही वाचा..

कॅनडाचे पंतप्रधन ट्रुडो देणार राजीनामा?

केजरीवाल यांचा ‘शीश महल’ लोकांना पाहण्यासाठी खुला करा!

बीड हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करतायत

टाटा पंचने मारुतीला मागे टाकले

दरम्‍यान, १ जानेवारी रोजी मुकेशचा चुलत भाऊ रितेश याने रस्‍ता बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्‍टर सुरेश चंद्राकार याच्याबरोबर मुकेश याची मिटींग ठेवली होती. त्‍या दिवसापासून मुकेश याचा मोबाईल बंद होता. मुकेश यांचा मोठा भाऊ युक्रेश चंद्राकर यांनी मुकेश यांचा फोन सतत बंद दाखवत असल्याने तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनच्या आधारे मुकेश हे कंत्राटदाराच्या आवारात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पुढे त्यांचा मृतदेहही हाती लागला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा