31 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरक्राईमनामाकुलगाममध्ये लष्करच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा

कुलगाममध्ये लष्करच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यासह तिघांचा खात्मा

सीआरपीएफ चौकीवरील हल्ल्यानंतर सुरक्षा दलांची शोधमोहीम

Google News Follow

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवारी (१६ नोव्हेंबर) सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यासह तीन दहशतवादी ठार झाले. लतीफ भट असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून, गेल्या आठवड्यात सीआरपीएफच्या चौकीवर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यात शोधमोहीम तीव्र केली होती.

पोलिसांना खुडवानी आणि आसपासच्या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलांनी परिसरात घेराबंदी करून शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांशी चकमक झाली. त्यात तिघांचा खात्मा करण्यात आला. वरिष्ठ लष्करी अधिकारी, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात आणि काश्मीर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुजित कुमार सिंह यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबवण्यात आली. दहशतवाद्यांना पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून परिसरातील येण्या-जाण्याचे मार्ग बंद करण्यात आले होते.

हे ही वाचा:

बिल्किस बानो प्रकरणातील दोन दोषींच्या जन्मठेपेला स्थगिती; जामीन मंजूर

जे. पी. नड्डांच्या ताफ्यावरील हल्ल्याप्रकरणी तृणमूलचा नेता अटकेत

भारत- इजिप्तमध्ये वाहतूक, पुरवठा, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात संधी

‘ऑपरेशन सिंदूर’मधून स्वदेशी शस्त्रांची ताकद सिद्ध!

सीआरपीएफ चौकीवर केला होता गोळीबार

११ नोव्हेंबर रोजी कुलगाममध्ये दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या चौकीवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. लतीफ भट याचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम दच्छन वनक्षेत्रात दोन बेपत्ता विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेले मृतदेह आढळले होते. या घटनांमुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा