26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरक्राईमनामापुरुषांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवणाऱ्या राजस्थानच्या तिघांना अटक 

पुरुषांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवणाऱ्या राजस्थानच्या तिघांना अटक 

Google News Follow

Related

महिलांच्या नावाने खोटे फेसबुक खाते उघडून पुरुषांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवून ‘सेक्सट्रॉशन’ करणाऱ्या एका टोळीला राजस्थानच्या भरतपूर येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांच्या एन .एम जोशी मार्ग पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाच्या मोबाईल फोनमध्ये पोलिसांना २००पेक्षा अधिक महिला आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ मिळून आले आहे.

सुनील कुमार दर्शन लाल राजपूत ( २३), जैकम दिन अलिशेर खान (३२), हामाद अजगर अली कादरी (२५) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत. हे तिघे राजस्थानातील भरतपूर येथे राहणारे असून या तिघांना अटक करण्यासाठी एन.एम जोशी मार्ग पोलिसांना स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली असून सुमारे १०० पोलिसांच्या ताफ्यासह भरतपूर येथे छापा टाकून या तिघांना अटक करण्यात आली आहे.

एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यवसायिकाचे अश्लील व्हिडिओ तयार करून या तिघांनाही या व्यवसायिकाला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन हजारो रुपये उकळले होते, त्यानंतर देखील या व्यवसायिकांकडून पैशाची मागणी सुरूच होती.

हे ही वाचा:

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांचा राजीनामा

शिवसेनेत आमदारांच्या नाराजीनाट्याला सुरुवात?

माणिकराव कोकाटेंच्या मुलीच्या लग्नात कोरोना नियमांचा वाजला बँड

जीएसटीमुळे अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन पर्यंत पोहोचेल

अखेर या व्यवसायिकाने एन.एम.जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले , पो.नि.कुंभार (गुन्हे),यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पथकाचे अधिकारी पो.उ.नि. निखिल  शेळके,मध्य विभाग सायबर पोलीस ठाणेचे पो.उप.नि. बी. पी. पाटील,पो.शि. राठोड आणि ठेंगले या पथकाने या गुन्हाचा तपास करून या टोळीचा माग काढला असता राजस्थान मधील भरतपूर या गावात या प्रकारे गुन्हे मोठ्या प्रमाणात करण्यात येत. या व्यवसायिकाकडून पैसे उकळणारी टोळी देखील याच गावात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. एन.एम.जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने राजस्थानमध्ये जाऊन स्थानिक पोलिसाच्या मदतीने या तिघांना बेड्या ठोकल्या.

ही टोळी फेसबुकवर महिलांचे बोगस खाते तयार करून त्यानंतर व्यवसायिक, व्यापारी तसेच श्रीमंताना फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवून त्याच्याशी महिला असल्याचे दाखवून मैत्री करीत होती, त्यानंतर एकमेकांचे व्हाट्सअँप मोबाईल क्रमांक देऊन अश्लील चॅटिंग करून त्यांना व्हिडीओ कॉल लावून त्यानंतर एका महिलेचा कपडे काढताना व्हिडीओ दाखवत आपल्या जाळ्यात अडकलेल्या सावजाला चॅटिंग मार्फत कपडे काढण्यास सांगितले जात होते. त्यानंतर सावजाचा अश्लील  व्हिडीओ ही टोळी त्याच्या मोबाइलमध्ये सेव्ह करून त्या व्हीडीओच्या मार्फत त्याच्याकडे ‘सेक्सट्रॉशन’च्या मार्फत पैसे उकळत अशी या टोळीची गुन्ह्याची पद्धत असून या गुन्ह्यात कुठल्याही महिलेचा समावेश नसून हा सर्व प्रकार पुरुषमंडळी करीत असल्याचे समजते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा