30.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरक्राईमनामाटायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

हल्लेखोरांना रसद आणि शस्त्रे पुरवणाऱ्यांची चौकशी

Google News Follow

हिंदी चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबईतील न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अंकित खत्री, समीर खाटक आणि जतीन पांचाळ अशी या आरोपींची नावे आहेत. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना रसद आणि अन्य मदत पुरवल्याचा आरोप या तिघांवर आहे. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, तपासातील महत्त्वाचे धागेदोरे उघड करण्यासाठी आणि प्रत्येक आरोपीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हे ही वाचा:
१.३० कोटींच्या ऑनलाइन गुंतवणूक फसवणूक प्रकरणात दोघांना अटक

‘बोरा’बिस्तरा गुंडाळून सगळे फरार!

इंजीनिअरिंगचे शिक्षण नाही; पण तयार केली उडती कार

जामिया विद्यापीठाच्या भिंतींवर ‘फ्री काश्मीर’चे नारे

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध केला. आरोपींचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसून, ते घटनास्थळीही उपस्थित नव्हते, असा दावा बचाव पक्षाने केला. तसेच हॉटेलच्या खोलीतून गोळी जप्त करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र, तपासाच्या दृष्टीने आरोपींची चौकशी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे ग्राह्य धरून न्यायालयाने कोठडी सुनावली.

शस्त्रपुरवठा केल्याच्या आरोपावरून चौघांना कोठडी

या प्रकरणात यापूर्वी गुरुवारी मुंबईतील एस्प्लेनेड न्यायालयाने कुणाल (२१), सुमित (१९), राधा (२३) आणि बबिता (२३) या चार आरोपींना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. हल्लेखोरांना शस्त्रे पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दिल्ली पोलिसांनी कुणाल आणि सुमित यांना हरियाणातील सोनीपत येथून, तर राधा आणि बबिता यांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले होते. या आरोपींकडून शस्त्रांचा पुरवठा कसा करण्यात आला, त्यासाठी कोणत्या व्यक्तींची मदत घेण्यात आली आणि हल्ल्याच्या कटात त्यांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत.

अमेरिकेतून सूत्रे हलवल्याचा संशय

१८ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या गोळीबार प्रकरणामागे अनिल पंडित (३२) हा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात व्यक्त केला आहे. पंडितचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय असून, तो सध्या अमेरिकेतून कारवाया करत असल्याचे मानले जाते. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा आरोपही आहे. त्याच्या सांगण्यावरूनच गोळीबाराचा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून, हल्ल्याचे नियोजन, शस्त्रांची उपलब्धता, आरोपींमधील संपर्क आणि गोळीबारामागील नेमका हेतू यांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींच्या भूमिकेची पडताळणी सुरू आहे. मात्र, या प्रकरणातील आरोप आणि सूत्रधाराबाबतचे दावे अद्याप तपासाच्या अधीन आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा