28 C
Mumbai
Wednesday, February 25, 2026
घरक्राईमनामावाझे टीआरपी घोटाळ्यातही

वाझे टीआरपी घोटाळ्यातही

सचिन वाझे हा एनआयएच्या ताब्यात अँटिलिया समोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात आला होता. मात्र आता एकामागोमाग एक वेगवेगळ्या खटल्यांच्या संदर्भात त्याचे नाव जोडले जात आहे. त्यापैकी एक म्हणजे टीआरपी घोटाळ्यात त्याचे नाव जोडले गेले आहे.

Google News Follow

Related

ईडीने केला आरोप

अँटिलिया समोरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. सचिन वाझे याचे नाव आता ईडी तपास करत असलेल्या टीआरपी घोटाळ्यातही जोडले गेले आहे.

सचिन वाझे याने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलच्या (बीएआरसी) अधिकाऱ्यांकडून ३० लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बीएआरसीच्या अधिकाऱ्यांनी त्याला लाच दिली होती. बीएआरसीने आपल्या खाते पुस्तकात हे पैसे त्यांचा आवारातील बांधकामाशी निगडीत काही कामासाठी दिले असल्याची नोंद केली आहे आणि नंतर बीएआरसीने हे पैसे एका डमी कंपनीच्या खात्यावर जमा केली आहे.

हे ही वाचा:

सचिन वाझेचा साथीदार रियाझ काझीला अटक

‘हिटमॅन’चे गेंड्याच्या बचावासाठी आवाहन

आजपासून देशभरात ‘लसोत्सव’

बीएआरसीच्या अधिकाऱ्यांना वाझे बोलावून घेत असे. त्यांना संध्याकाळी उशिरापर्यंत बसायला लावून नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगत असे. त्याबरोबरच सचिन वाझे याने संशयितांना चौकशी दरम्यान आपण मारहाण करत असल्याची आणि छळ करत असल्याची प्रतिमा देखील तयार करून ठेवली होती. त्याचा गैरफायदा घेऊन हा छळ टाळण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच मागत असल्याचा देखील आरोप केला आहे.

ईडीने बीएआरसीच्या अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले आणि त्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. आता ईडी सचिन वाझे याची चौकशी करणार आहे. त्याबरोबरच वाझेंना सहाय्य करणाऱ्या क्राईम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याची देखील चौकशी करणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा