23 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरक्राईमनामापूजा खेडकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, ट्रक चालकाचे अपहरण करून घरात डांबले

पूजा खेडकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, ट्रक चालकाचे अपहरण करून घरात डांबले

Google News Follow

Related

आयएएससाठी अपंगत्वाचा गैरफायदा घेणारी पूजा खेडकर आता आणखी एका वादग्रस्त प्रकरणात चर्चेत आली आहे. एका ट्रकचालकाचेच अपहरण करून त्याला खेडकरच्या घरी डांबण्यात आल्याचे हे प्रकरण आहे. ऐरोली येथे हा अपघात झाला आणि नंतर ट्रक चालकाचे अपहरण करण्यात आले. तो ट्रकचालक पूजा खेडकरच्या पुण्यातील घरात सापडला आहे. त्यामुळे आधीच वादग्रस्त ठरलेल्या खेडकर यांच्यासाठी नवी अडचण निर्माण झाली आहे.

नवी मुंबईतील ऐरोली सिग्नलवर मिक्सर ट्रक आणि कार यांची धडक झाली. अपघातानंतर ट्रकचालक प्रल्हाद कुमार अचानक गायब झाला. पोलिसांच्या चौकशीत समजले की, एमएच १२ आरटी ५००० क्रमांकाच्या कारने ट्रकला धडक दिली होती.

पोलिसांनी सांगितले की, अपघातानंतर कारमधील दोघांनी जबरदस्तीने ट्रकचालकाला आपल्या गाडीत बसवून नेले. तपासादरम्यान ही कार पुण्यातील चतु:श्रृंगी भागातील पूजा खेडकर यांच्या घरी असल्याचे आढळले. पोलिसांनी छापा टाकून अपहृत चालकाची सुटका केली.

हे ही वाचा:

भारत-पाक सामन्याला विरोध, मंत्री रिजिजू यांनी सुनावले!

सीमेवर नेपाळहून पळालेल्या चार परदेशी कैद्यांना अटक

यूपीची ‘विकसित यूपी ॲट २०४७’ या व्हिजनकडे वाटचाल

विरोधकांना बिहारमध्ये विकास दिसत नाही

पोलिसांना विरोध

या कारवाईदरम्यान पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आई मनोहरमा खेडकर यांचा विरोध सहन करावा लागला. त्यांनी पोलिसांशी वाद घातला, दरवाजा उघडण्यास नकार दिला आणि कारवाईत अडथळा निर्माण केला. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना समन्स बजावून पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पूजा खेडकर यांचे वादग्रस्त भूतकाळ

गेल्या वर्षी केंद्राने त्यांना आयएएस सेवेतून बडतर्फ केले. त्यांच्यावर ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरफायदा घेण्याचा आरोप सिद्ध झाला. त्यांनी वारंवार चुकीची ओळख दाखवून यूपीएससी परीक्षा दिल्याचे आढळल्याने आयोगाने त्यांना आजीवन परीक्षा देण्यास बंदी घातली. एका व्हायरल व्हिडिओत त्या जमिनीच्या वादादरम्यान बंदूक दाखवताना दिसल्या होत्या. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील हिरकनिवाडी गावातून त्यांना अटक करण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा