राजस्थानमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत बळजबरीने सुरू असलेल्या धर्मांतराच्या रॅकेटचा कट उघडकीस आणला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन जणांना अटक करत ५० हून अधिक मुलांची सुटका केली आहे.
राजस्थान पोलिसांनी अलवरच्या सय्यद कॉलनीतील ख्रिश्चन मिशनरी वसतिगृहात सुरू असलेल्या बेकायदेशीर धर्मांतराच्या कारवाईचा कट उधळून लावला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली असून ५० हून अधिक मुलांची सुटका केली. छापेमारीमध्ये आढळून आले की, ६ ते १७ वयोगटातील मुलांना; बहुतांश हिंदू आणि शीख मुलांना त्यांच्या श्रद्धा नाकारून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. त्यांना सांगण्यात आले होते की त्यांचे हिंदू देव बनावट असून ते त्यांना नरकात पाठवतील. फक्त येशू त्यांना वाचवेल. या मुलांना आरोपींनी त्यांच्या मूळ धर्मांविरुद्ध बोलण्यास भाग पाडल्याचा आणि केवळ बायबलमधील शिकवणींचे पालन करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा..
नेपाळ परिस्थितीबद्दल भारत चिंतित
जीएसटी २.० च्या रोलआउटनंतर कशाला मिळणार चालना ?
गूगल सर्चचा एआय मोड आता हिंदीतही !
नमो घाटही पुराच्या पाण्याखाली, प्रशासन सतर्क
या प्रकरणी गुजरातमधील बोधर अमृत (वय ४४ वर्षे) आणि सोनू रायसिख (वय ३४ वर्षे) यांना अलवर येथून अटक करण्यात आली आहे. संबंधित वसतिगृह हे चेन्नईस्थित संघटनेच्या फ्रेंड्स मिशनरी प्रेयर बँड (एफएमपीबी) शी जोडलेले आहे. अमृतला यापूर्वी २०२४ मध्ये सीकरमध्ये अशाच एका प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि आता तो जामिनावर बाहेर होता. जबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच निधीचा स्त्रोत आणि इतर नेटवर्कचा शोध घेण्यासाठी धार्मिक ग्रंथ, डिजिटल साहित्य आणि बँक रेकॉर्ड जप्त करण्यात आले आहेत.







