31.3 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरक्राईमनामाइसिस संघटनेशी संबंधित दोन संशयिताना ठाणे, कुर्ल्यातून अटक

इसिस संघटनेशी संबंधित दोन संशयिताना ठाणे, कुर्ल्यातून अटक

मुंबई-ठाण्यात एटीएसची मोठी कारवाई

Google News Follow

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करत ऑनलाइन कट्टरतावादाशी संबंधित इसिस या दहशतवादी मॉड्यूलमधील दोन संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

ठाण्यातील खडवली आणि मुंबईतील कुर्ला परिसरातून या दोघांना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान आरोपींकडून महत्त्वाचे कागदपत्रे तसेच मोबाईल फोनसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

कर्णधार दमदार; लखनऊ सुपर जायंट्सचा हैदराबादवर मोठा विजय

जेवणानंतर गोड खाण्याची सवय का लागते? शरीर देतंय महत्त्वाचा इशारा

हॉर्मुझ संकटातही भारत निर्धास्त; सरकारचा ‘थार प्लॅन’ ठरतोय प्रभावी

हिंदू नाव धारण करून विधवेला छळणाऱ्या समीर खानच्या मुसक्या आवळल्या!

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दोन दिवसांपूर्वी पार पडली असून अटक केलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्यात आले आहे. संबंधित दहशतवादी मॉड्यूलचे संचालन ओडिशामधून होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यामागील सूत्रधार सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आरोपी आणि संबंधित गटाविरोधात गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा