26 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरक्राईमनामानेव्ही नगरातून इन्सास रायफल चोरलेले दोघे भाऊ तेलंगणातून अटकेत

नेव्ही नगरातून इन्सास रायफल चोरलेले दोघे भाऊ तेलंगणातून अटकेत

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

Google News Follow

Related

नेव्ही नगर परिसरातून इन्सास रायफल आणि ४० जिवंत काडतुसे भरलेल्या मॅगझिनसह फरार झालेल्या दोन भावांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तेलंगणातून अटक केली आहे. पकडलेले आरोपी भाऊ असून त्यातील एक जण नेव्हीत सैनिक होता. पोलिसांनी त्यांच्याकडून रायफल, तीन मॅगझिन आणि दारुगोळा जप्त केला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई पार पडली. या दोघांच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल १० पथके तयार करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) देखील सहभागी झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ७:२० वाजता आरोपींपैकी एकाने नेव्ही नगरच्या मुख्य प्रवेशद्वारातून ओळखपत्र दाखवून प्रवेश केला. त्यानंतर तो संत्री ड्युटीवर असलेल्या जवानाला ‘रिलिव्ह’ करण्यासाठी आलो असल्याचे सांगत त्याच्याकडून रायफल आणि तीन मॅगझिन घेतो. नंतर शस्त्र आणि दारुगोळा कंपाउंडच्या भिंतीबाहेर फेकून देतो, जिथे त्याचा भाऊ थांबलेला होता. दोघेही रायफल व दारुगोळा घेऊन पसार झाले.

आरोपीने या कारवाईदरम्यान नेव्हीचा गणवेश असलेला बॅकपॅक वापरला होता. त्याने स्वत:ला वरिष्ठ असल्याचे सांगत ज्युनियर खलाशीकडून सर्व्हिस रायफल आणि दोन भरलेली मॅगझिन सहज उचलली. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली होती.

फरार भावांचा शोध घेण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचची पथके राज्याबाहेर रवाना झाली होती. अखेर तेलंगणातून दोघांना बेड्या ठोकण्यात यश आले. मात्र, या चोरीमागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. आरोपींना चौकशीसाठी मुंबईत आणले जात असून पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचा : 

ट्रम्प म्हणतात, प्रिय मित्र मोदींशी बोलायची इच्छा; पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज भारतात लाँच; काय आहेत फीचर्स?

घालीन लोटांगण… विदेशी मीडियाची मोदींवर स्तुतिसुमने |

उपराष्ट्रपती पदाचास्पष्ट झाला निकाल |

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा