30 C
Mumbai
Tuesday, March 17, 2026
घरक्राईमनामाकर्नाटकमध्ये दोन दलित तरुणांची हत्या

कर्नाटकमध्ये दोन दलित तरुणांची हत्या

Google News Follow

Related

कर्नाटकमध्ये जातीवादातून तरुणांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकमधील पेडनहल्ली गावात जातीवादातून दोन दलित तरुणांवर अत्याचार करून त्यांची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. गिरीश मुदलगिरीअप्पा (३०) आणि गिरीश (३२) अशी दोन तरुणांची नावे आहेत. मुदलगिरीअप्पा यांचा विद्रुप झालेला मृतदेह शेतात तर गिरीशचा मृतदेह गावाच्या बाहेरील तलावात तरंगताना आढळून आला.

गुरुवारी रात्री या प्रकरणातील एक प्रमुख आरोपी नंदिश हा दोन्ही गिरीश यांच्या घरी गेला आणि त्यांना गावातील मंदिरात साजरा होणाऱ्या उत्सवासाठी येण्यास आग्रह करू लागला. त्यानंतर त्याने या दोघांनाही एका निर्जन ठिकाणी नेले. त्याठिकाणी त्याचे काही मित्र उपस्थित होते. त्यानंतर मात्र नंदिश आणि त्याच्या मित्रांनी या तरुणांचे पाय नारळाच्या झाडाच्या वाळलेल्या पानांनी जाळले आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

लाकडांमध्ये लपवले होते ७०० कोटींचे हेरॉईन

‘राणा दाम्पत्यांची केसच बोगस’

गुवाहाटी महापालिका निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ५८ जागा जिंकल्या

‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी विचारले ‘हे’ सात प्रश्न

दरम्यान त्यांनी आरोपींना मारहाण केली. या मारहाणीत गिरीश मुदलगिरीअप्पा याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह तलावात ढकलण्यात आला. या निर्घृण हत्येनंतर गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, दलित संघटनांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुब्बी पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध आरोपांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा