पुण्याच्या दौंड तालुक्यातील यवत गावात दोन गटात तणाव निर्माण झाला असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी पोस्ट टाकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहे, पोलीसंकडून रूटमार्च काढला जात आहे. गावातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. खर तर, गुरुवारी (३१ जुलै) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जाहीर सभा घेतली आणि तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. पण आज एका विशिष्ट समुदायाच्या तरुणाने त्या घटनेचे व्हॉट्सअॅप स्टेटस टाकल्याने गोंधळ उडाला.
अचानक ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली आणि इतर समुदायाचे लोक या व्हॉट्सअॅप स्टेटसचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. दोन्ही बाजूंनी दगडफेक, तोडफोड, जाळपोळ झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली. पोलिसांनी हे व्हॉट्सअॅप स्टेटस टाकणाऱ्या तरुणालाही ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा :
दुर्धर आजाराने त्रस्त आईने घेतला पोटच्या बाळाचा जीव
‘बनावट’ पोलिसांनी घरात घुसून ट्रान्सफर करून घेतले ९० हजार
राहुल गांधींचे ‘मतचोरी’चे आरोप, आयोग म्हणाले-अशा निराधार आरोपांकडे दुर्लक्ष करा!
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, एका व्यक्तीने अतिशय आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट केले होते. गोंधळामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोनही समाजाचे लोक एकत्रित बसले आहेत.
तणाव निर्माण व्हावा म्हणून जाणीव पूर्वक असे स्टेटस काही लोक ठेवत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सर्वांना शांततेचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन करतो, जर कोणी असे करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.







