मुंबईतील पूर्व उपनगर मागील ४८ तासांत झालेल्या दोन बलात्काराच्या घटनांनी हादरले आहे. गोवंडी येथे आजारी आईच्या मदतीसाठी आणलेल्या ३० वर्षीय महिलेला ‘रुह अफजा’ सरबत पाजून तिच्यावर २९ वर्षीय तरुणाने तर मुलुंड येथे दोन जणांनी १६ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
या दोन्ही घटनाप्रकरणी मुलुंड आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा झाला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब बोरकर हा गोवंडीतील बैगनवाडी येथील रहिवासी आहे. जानेवारी २०२१ मध्ये शोएब याची आई आजारी असल्यामुळे मानखुर्द येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेला आईच्या मदतीसाठी कामावर ठेवण्यात आले होते. ती दररोज शोएबच्या घरी कामासाठी येत असे.
ऑगस्ट महिन्यात शोएबने पीडित महिलेला फोन करून तिला त्याच भागात असलेल्या एका नर्सिंग होमच्या मागे येण्यास सांगितले. पीडिता त्याला भेटायला गेली असता त्याने तिला ‘रूह अफजा’ सरबत पाजले. त्यानंतर पीडितेला तिच्यासोबत काय घडले हे आठवले नाही.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत जोगेश्वरीचे नगरसेवक प्रवीण शिंदे आता शिवसेनेत
काँग्रेस म्हणजे गंजलेले लोखंड!
शतकवीर श्रेयस अय्यर म्हणाला, मला एकटेपणाने ग्रासले होते!
कारमधील एअरबॅग ‘गहाळ’ केल्याप्रकरणी आनंद महिंद्रा आणि अन्य १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
त्यानंतर शोएबने पीडितेचे असलेले अश्लील छायाचित्रे आणि व्हिडीओ तीला दाखवत ते तिच्या कुटुंबीयांना पाठवण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.शोएबच्या वारंवार होणाऱ्या अत्याचारा ला कंटाळून अखेर पीडितेने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणी शोएब बोरकर विरुद्ध भादवी. कलम ३७६ (बलात्कार), ३७६ (२) (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), ३२८ (दुखापत करण्याच्या उद्देशाने गुंगीचे औषध देणे), ३२३ (स्वच्छेने दुखापत करणे), ५०६ (गुन्हेगारी धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दरम्यान मुलुंड पश्चिम येथे राहणाऱ्या १६वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिच्या आईने तीला उपचारासाठी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून ती तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निदान करताच पीडित मुलीच्या आईच्या पाया खालची वाळूच सरकली.
पीडितेची आई पीडितेला घेऊन मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला आली.पोलिसानी पीडितेला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता पीडिता राहत असलेल्या परिसरातील दोन जणांनी मे महिन्यात गुंगीचे औषध पाजून तर कधी नशेचे द्रव्य पाजून वारंवार बलात्कार केला अशी माहिती तीने पोलिसांना दिली.
याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी दोन जणांवर पोक्सो, बलात्कार, गुंगीचे औषध देणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.







