29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरक्राईमनामाशोपियानमध्ये टार्गेट किलिंगमध्ये दोन मजुरांची हत्या

शोपियानमध्ये टार्गेट किलिंगमध्ये दोन मजुरांची हत्या

जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे.

Google News Follow

Related

जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे. शोपियान मधील हरमन परिसरात हा हल्ला करण्यात आला असून यात दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही मजूर उत्तर प्रदेशचे होते. मनोज कुमार आणि राम सागर अशी या मजुरांची नावे आहेत.

दहशतवाद्यांनी शोपियान येथील हरमन परिसरात दोन मजुरांवर हल्ला केला. मनोज कुमार आणि रामसागर हे दोघेही उत्तरप्रदेशच्या कन्नोज येथील होते. हे दोन्ही मजूर एका टीन शेडमध्ये झोपले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोन्ही मजूर गंभीर जखमी झाले. त्यावेळी जखमी मजुरांना स्थानिक नागरिकांनी आनन- फनन येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

एडीजीपी काश्मीर झोनचे विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी इमरान बशीर गनी आणि हरमन यांनी मजुरांवर हल्ला केला होता. दोन्ही दहशतवादी शोपियान पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा

मद्य घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांची सीबीआयकडून ९ तास चौकशी

महाराष्ट्र कोणासोबत हे ग्रामपंचायत निवडणुकीने दाखवून दिले

बोरिवली ते ठाणे प्रवास आता तासात नाही मिनिटांत

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

काही दिवसांपूर्वी म्हणजेच १५ ऑक्टोबरला दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितावर हल्ला केला होता. शोपिया येथे दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर हे दहशतवादी फरार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरण कृष्ण भट्ट यांच्या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा