31 C
Mumbai
Thursday, August 27, 2026
घरक्राईमनामापुलवामामध्ये दहशतवाद्यांचे दोन साथीदार अटकेत

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचे दोन साथीदार अटकेत

एक पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे आणि एक हँड ग्रेनेड जप्त

Google News Follow

Related

सुरक्षादलांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक केली. राजपोरा येथील सीबी नाथ परिसरातील यारवान जंगलात राबवण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एक पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे आणि एक हँड ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवादी साथीदारांच्या हालचालींबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पुलवामा पोलिसांनी लष्कराच्या ४४ राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) १८३ बटालियनच्या जवानांसोबत संयुक्त कारवाई केली.

हे ही वाचा:

“नारळ फोडणे, कापूर पेटवणे चुकीचे”; हिंदू प्रथांविरोधात पत्रकवाटप

शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालता येणार नाही!

धोत्र्याच्या फळाची ऑनलाइन विक्री; ऍमेझॉनसह तीन कंपन्यांचे लायसन्स निलंबित

युपीआयची दशकपूर्ती; डिजिटल पेमेंट्समधील ऐतिहासिक ‘टर्निंग पॉइंट’!

शोध मोहिमेदरम्यान संयुक्त पथकाला जंगल परिसरातून सीबी नाथ गावाच्या दिशेने संशयास्पदरीत्या येणारे दोन जण दिसले. सुरक्षा दलांनी त्यांना तातडीने रोखून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची ओळख पुलवामामधील गाव लस्सी डबन येथील गुलाम मोहम्मद दीदार यांचा मुलगा लतीफ अहमद दीदार आणि बुन खा बमूनू येथील नजीर अहमद बाजाद यांचा मुलगा एजाज अहमद बाजाद अशी झाली. या प्रकरणी राजपोरा पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायदा आणि बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यातील (UAPA) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा