30.6 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरक्राईमनामाधक्कादायक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड!

धक्कादायक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड!

पोक्सो कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल, एकाला अटक

Google News Follow

पुण्यातील अत्याचार प्रकरण ताजे असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुक्ताईनगर कोथळी गावातील यात्रेदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. मंत्री रक्षा खडसे यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी छेड काढणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु

याबाबत माहिती देताना मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, २८ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोथळी गावात संत मुक्ताई यांची यात्रा असते. माझ्या मुलीने यात्रेत जाणार असल्याचे सांगितले. मी गुजरातला असल्या कारणाने गार्ड आणि ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना घेवून यात्रेत सहभागी असल्याचे तिला सांगितले. मुलीसोबत तिच्या मैत्रीनीही होत्या.

यात्रेत सहभागी झाल्यानंतर काही टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग केला, जबरदस्तीने त्यांच्या पाळण्यात बसले. आमच्या सुरक्षा रक्षकाने आमच्या मुलींना त्या पाळण्यातून उतरवून दुसऱ्या पाळण्यात बसवेल. मात्र, तेथेही टवाळखोरांनी तोच प्रकार केला, त्याच पाळण्यात येवून बसले.

हे ही वाचा : 

तेलंगणाच्या बोगद्यात अडकलेल्या ४ जणांचे ठिकाण सापडले!

१५ वर्षे जुने वाहन असेल तर ‘पेट्रोल’ नाही!

राजस्थान: बलात्कार-ब्लॅकमेल प्रकरणाची सकल हिंदू समाजाकडून निदर्शने!

धक्का पुरुष ते शिक्का पुरुष !

ते तरुण मोबाईलवर व्हिडीओ काढत असल्याचे समोर येताच सुरक्षा रक्षकाने मोबाईल हिसकावून पाहिले असता अन्य कोणाला तरी व्हिडीओ कॉल केल्याचे निदर्शनास आले. यावेळी सुरक्षा रक्षकांसोबत त्यांनी धक्काबुक्की केली, मुलींसोबत छेडछाड केली. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत बोलणे झाले असून त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अनिकेत भोई, सचिन, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरीतांचा शोध सुरु आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा