उत्तर प्रदेशात पोलिसांनी ३ तासांच्या आत ३ गुन्हेगारांना चकमकीत ठार केले आहे. पोलिसांच्या चकमकीत सीतापूर येथील पत्रकार राघवेंद्र बाजपेयी हत्या प्रकरणातील दोनही शुटर ठार झाले आहेत. या चकमकीत झारखंडचा कुख्यात गुन्हेगार आशिष रंजन हा पोलिस चकमकीत ठार झाला. आशिष रंजनकडून एके ४७ जप्त करण्यात आली आहे.
पहिली चकमक प्रयागराजमध्ये झाली. पोलिसांना विश्वसनीय माहिती मिळाली होती की झारखंडमधील धनबाद येथील रहिवासी असलेला आशिष रंजन उर्फ ‘छोटू सिंग’ हा त्याच्या एका साथीदारासह एक मोठा गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी प्रयागराजला जात आहे.
या गोपनीय माहितीच्या आधारे, एसटीएफच्या प्रयागराज युनिटचे एक पथक आरोपीला अटक करण्यासाठी शिवराजपूर चौकाजवळ पोहोचले. यावेळी, आरोपी आशिष रंजन तेथून जात असताना, एसटीएफने त्याला आव्हान दिले तेव्हा त्याने एसटीएफ टीमवर एके-४७ रायफल आणि ९ एमएम पिस्तूलने अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
या गोळीबारात एसटीएफचे तीन जवान जेपी राय, प्रभंजन आणि रोहित थोडक्यात बचावले. प्रत्युत्तरात रंजनला गोळी लागली. त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक भरलेले एके-४७, ९ एमएम पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि वापरलेले गोळे आणि एक मोटारसायकल जप्त केली. खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
उमा भारतींनी साध्वी प्रज्ञा यांची भेट घेतली, म्हणाल्या- ‘मसिहा’
पाक लष्करप्रमुखांची पुन्हा अमेरिका वारी!
ट्रम्प यांनी आयात शुल्क दुप्पट करून ५० टक्के केले, भारत म्हणाले-“अत्यंत दुर्दैवी”
ट्रम्प यांच्या चिडचिडीचे कारण पल्की, रशिया की एफ-३५?
दुसरी चकमक सीतापूर जिल्ह्यात झाली. या चकमकीत पोलिसांनी पत्रकार राघवेंद्र बाजपेयी हत्या प्रकरणातील दोनही शुटरना ठार केले. पिसावन पोलीस स्टेशन परिसरातील हरदोई सीतापूर सीमेवर ही चकमक झाली. राघवेंद्र बाजपेयी हत्या प्रकरणात मारल्या गेलेल्या शूटरवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस होते.
पत्रकार राघवेंद्र बाजपेयी यांची ८ मार्च रोजी सीतापूरमधील हेमपूर ओव्हरब्रिजवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणात दोनही शूटर फरार होते. पथकांकडून त्यांचा शोध सुरु होता, आज झालेल्या पोलिसांच्या चकमकीत त्यांना ठार केले.







