31 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरक्राईमनामाचेहरा झाकून हातात काठ्या, दगड घेऊन घडवली हिंसा; नागपूरमधील सीसीटीव्ही फुटेज समोर

चेहरा झाकून हातात काठ्या, दगड घेऊन घडवली हिंसा; नागपूरमधील सीसीटीव्ही फुटेज समोर

जमावाकडून पोलिसांच्या पथकावर दगडफेक केल्याचे दृश्यही कैद

Google News Follow

Related

औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा चांगलाच पेटला असून याचे पडसाद नागपूरमध्ये उमटले. नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गट आमने सामने येऊन त्यांच्यात तूफान हाणामारी झाली. हाणामारीला पुढे हिंसक वळण मिळाले आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. बाहेरून लोक आले आणि त्यांनी हिंसा घडवली असा आरोप करण्यात येत असून आता नागपूर हिंसाचाराचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जमाव पोलिसांच्या पथकावर दगडफेक करत आहे. दंगलखोरांची वाढती गर्दी पाहून पोलिस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत पण जमाव वेगाने पुढे सरकत आहे आणि पोलिस पथकावर हल्ला करत आहे. पोलिस पथकावर झालेल्या दगडफेकीत डझनभराहून अधिक पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर अनेक सामान्य नागरिकही जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सुमारे ८० जणांना अटक केली आहे. शिवाय सीसीटीव्हीच्या आधारे आणखी कोणाचा सहभाग होता हे ओळखून अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

महाल परिसरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये ५० ते १०० दंगलखोरांचा जमाव वस्त्यांमध्ये घुसून हिंदू कुटुंबांच्या मालमत्तेची नासधूस करताना स्पष्टपणे दिसत आहे. हातात काठ्या आणि दगड घेऊन वाहनांना लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच काही समाजकंटक रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना आग लावत आहेत. अनेकांनी चेहरा झाकला असून दगडफेक करताना आणि पळताना दिसत आहेत.

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी उजव्या विचारसरणीच्या संघटनेने केलेल्या निदर्शनादरम्यान धार्मिक ग्रंथ जाळले अशा अफवा पसरल्यानंतर नागपुरात हा हिंसाचार उसळला. प्रत्यक्षात औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. संध्याकाळी या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. दोन गटांमध्ये राडा झाला आणि नागपुरातील महाल परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले. एकमेकांवर दगडफेक सुरू झाली आणि वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यात अनेक पोलीस जखमी झाले.

हे ही वाचा : 

छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह रील, दोन मुस्लीम तरुणांना अटक!

नागपूर हिंसाचार: पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत ८० जणांना घेतलं ताब्यात

इस्रायलकडून गाझा पट्टीवर हवाई हल्ला

विरोधात बोलाल तर नग्न करून मारीन…

माहितीनुसार, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास ८० जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे. तर, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी ५५ सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास १८०० सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात सध्या तणाव असून ज्या परिसरामध्ये ही दगडफेक झाली होती तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा