28 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरक्राईमनामा'व्हिसेरा'च्या अहवालानंतर सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल?

‘व्हिसेरा’च्या अहवालानंतर सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल?

Google News Follow

Related

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा मृत्यू नेमका ह्रदयविकारच्या धक्क्याने झाला की त्यामागे आणखी काही कारण असू शकते का ? अशी संशयाची पाल अनेकांच्या मनात चुकचुकत आहे. मात्र शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामुळे अनेकांची शंका दूर झाली असली एवढ्या कमी वयात आणि एवढा तंदुरुस्त असतांना सिद्धार्थचा मृत्यू हा नक्की कशामुळे झाला याचे कोडे अनेकांना पडले आहे. परंतु सिद्धार्थच्या व्हिसेरा अहवालानंतर प्रत्येकाची शंका दूर होऊ शकते. अर्थात, सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांना कुठलाही संशय नसल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तरी व्हिसेरा अहवालानंतर सर्व खुलासे होऊ शकतात असे पोलिसांचे मत आहे.

बिगबॉस विजेता आणि हिंदी टीव्ही मालिकेतील टॉपचा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे वयाच्या ४०व्या वर्षी त्याच्या राहत्या घरी निधन गुरुवारी सकाळी निधन झाले. आदल्या दिवशी रात्री म्हणजे बुधवारी रात्री तो त्याच्या इमारतीच्या खाली शतपावली करीत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तो झोपण्यासाठी घरी गेला होता. दरम्यान त्याने आईकडे पिण्यासाठी पाणी देखील मागितले होते, त्यानंतर तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली असता सिद्धार्थ डोळे उघडत नसल्याचे बघून ती घाबरली आणि मुलीला फोन केला. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टर घरी येताच त्यांनी सिद्धार्थ ला तपासले मात्र त्याच्या हाताची नस मिळत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला कूपर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. कूपर रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

कूपर रुग्णालयात सिद्धार्थ शुक्ला याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. ५ डॉक्टरच्या टीमकडून ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे. ओशिवरा पोलिसांना दिलेल्या प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ‘कार्डिअल अरेस्ट’मुळे ( हृदयविकाराचा धक्का)  त्याचा मृत्यू झाला असे नमूद करण्यात आले आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या शरीरावर कुठलेली व्रण नसल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान डॉक्टरांनी सिद्धार्थचा व्हिसेरा घेतला असून तो तपासणी करता कलिना येथील फॉरेन्सिक लॅब कडे पाठवण्यात आला आहे. व्हिसेराचा अहवाल येण्यासाठी किमान दोन महिन्यांच्या कालावधी लागू शकतो.

हे ही वाचा:

सरकारचे डोके ठिकाणावर आले; एसटी कर्मचाऱ्यांसाठी ५०० कोटी वितरित

अखेर राज्य सरकारने देशमुख यांची कागदपत्रे सोपविली सीबीआयकडे

गायीला राष्ट्रीय पशु घोषित केले जावे

विराटच्या संघ निवडीवर शशी थरूर वैतागले! म्हणाले…

व्हिसेरा म्हणजे मृत व्यक्तीच्या पोटातील नमुने घेणे, मृत व्यक्तीने मृत्यूपूर्वी काय खाल्ले होते, त्यातून त्याला विषबाधा झाली होती का, किंवा त्याने घेतलेल्या औषधाचा दुष्परिणाम झाला का? किंवा त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता हे सर्व या अहवालातून स्पष्ट होते. हा अहवाल येण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन महिन्यांच्या कालावधी लागू शकतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा