दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट या खाजगी संस्थेतील १७ विद्यार्थ्यांनी लैंगिक छळ केल्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर संचालक चैतन्यानंद सरस्वती यांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान त्यांच्या फोनमधून अनेक रहस्य उलगडली असून ६२ वर्षीय सरस्वती यांच्या फोनमध्ये अनेक महिलांशी केलेले चॅटिंग मेसेजेस आढळले आहेत. या दरम्यान एक नवा खुलासा झाला असून चैतन्यानंद सरस्वती हे दुबईच्या शेख सोबत संपर्कात असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थिनी आणि दुबई शेख यांच्या भेटीचे आयोजन करण्याचा चैतन्यानंद यांचा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे.
दुबईच्या एका शेखला शारीरिक संबंधांसाठी तरुणी हवी असल्याचे चैतन्यानंद एका विद्यार्थिनीला म्हणत आहे. त्यामुळे विद्यार्थिनीने तिची कोणी मैत्रीण अथवा कोणी कनिष्ठ सहकारी असल्यास सांगावे, असे चैतन्यानंद म्हणत असल्याचे मेसेजेस सापडले आहेत. आणखी एका संभाषणात चैतन्यानंद वारंवार एका पीडितेला वारंवार दिवस- रात्र मेसेज करत असल्याचे उघड झाले आहे. सातत्याने चैतन्यानंद हे पीडितेला ‘बेबी’ ‘बाळ’ अशा नावाने संबोधत आहे. आणखी एका मेसेजमध्ये चैतन्यानंद पीडितेला विचारात आहेत की, तू माझ्यासोबत झोपणार नाहीस का?
हेही वाचा..
ओम बिरला यांची उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी भेट
श्री नैना देवी मंदिरात रामनवमीला सिद्धिदात्री स्वरूपाची पूजा
आरबीआयने आयपीओ कर्ज मर्यादा दुप्पट केली
महानवमीला गोरखनाथ मंदिरात मुख्यमंत्री योगींची ‘शक्ती साधना’, ‘मुलींचे पाय धुऊन केली पूजा’
१७ विद्यार्थिनींना त्रास देण्याचा आरोप असलेल्या चैतन्यानंद यांना रविवारी पहाटे ३:३० वाजता आग्र्याच्या ताजगंज परिसरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, चैतन्यानंद जवळजवळ दोन महिन्यांपासून अटकेपासून वाचत होते. ते वृंदावन, मथुरा आणि आग्रा येथे फिरत होते आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी लहान हॉटेलमध्ये राहत होता. अटकेदरम्यान, पोलिसांनी एक आयपॅड आणि तीन मोबाईल फोन जप्त केले. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचे “कायमस्वरूपी राजदूत” आणि ब्रिक्सचे “विशेष दूत” असे त्यांचे नाव असलेले बनावट व्हिजिटिंग कार्ड देखील जप्त करण्यात आले.







