उत्तर प्रदेशातील रामपूर येथील एका घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला न्यायालयाबाहेर पुरूषाला चपलांनी मारहाण करताना दिसत आहे. यावर संबंधित महिलेने म्हटले आहे की, तिच्या पतीने याआधीही तिच्याशी हिंसक वर्तन केले असून तलाक सुनावल्यानंतर ही घटना घडली आहे.
महिलेने सांगितले की, तिचे लग्न २०१८ मध्ये झाले होते आणि त्यानंतर लगेचच तिच्या पतीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने हुंड्याची मागणी केली शिवाय दोन मुलींना जन्म दिल्यानंतर तिला घराबाहेर काढले. यानंतर या महिलेने पोटगीसाठी दावा दाखल केला तेव्हा तो मुलांना घेऊन गेला. त्यामुळे तिच्याकडे न्यायालयाची मदत घेण्याशिवाय काहीही पर्याय नव्हता. यानंतर तिने आर्थिक मदतीची मागणी करणारा खटला दाखल केला.
शुक्रवारी, ती तिच्या मावशीसोबत या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाली होती, तर तिचा पती त्याच्या वडिलांसोबत उपस्थित होता. तिच्या म्हणण्यानुसार, ती न्यायालयाबाहेर पडताच तिचा पती आणि सासरे तिच्या मागे आले आणि त्यांनी तिला शिवीगाळ केली तसेच खटला मागे घेण्यासाठी दबाव आणला. तिने आरोप केला की तिच्या पतीने त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून तीन वेळा तलाक दिला आणि त्यानंतर दोघांनी तिच्यावर हल्ला केला. अखेर तिने स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर म्हणून चप्पल काढल्या आणि तिच्या पतीला मारहाण करू लागली. तिथे गर्दीही जमली होती. हाणामारीत तिच्या पतीचा कुर्ता फाटला. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही घटना रेकॉर्ड केली आणि लवकरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला.
पूजा खेडकरच्या आईचा प्रताप, ट्रक सहाय्यकाचे अपहरण करून घरात डांबले; नेमके काय घडले?
तेजस्वी यादव यांनी आधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबाचा विचार करावा!
भारत- रशिया संबंध बिघडवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतील!
पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी डीजेने वाजवला ‘जलेबी बेबी’
महिलेने पुढे म्हटले की, मी का रागावू नये? त्याने मला तलाक दिला, माझ्या मुलांना माझ्यापासून हिरावून घेतले आणि माझे आयुष्य उध्वस्त केले. यासाठी त्याला शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी, मला माझी मुले परत हवी आहेत आणि मला माझ्या मुलींसह त्या घरात राहायचे आहे. त्याने मला जबरदस्तीने मारहाण केली आणि बाहेर हाकलून दिले.







