सह्याद्री स्टेट गेस्ट हाऊससमोर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिला पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बेस्टची इलेक्ट्रिक बस रस्त्यावर उभी असलेल्या कारला धडकली आणि बस व कारच्या मधोमध अडकून त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला.
मृत महिलेचे नाव नीता शाह असून त्या राठी रिज रोडवरील प्रकाश बिल्डिंगमध्ये राहत होत्या. अपघाताच्या वेळी त्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. अचानक झालेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा:
‘कभी अलविदा ना कहना’ला १९ वर्ष पूर्ण
कुठे एका जवानाच्या बलिदानाची कथा?
पोलिसांनी त्या जखमी महिलेला आपल्या गाडीतून नेले पण नंतर ती मृत असल्याचे स्पष्ट झाले.







