32 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरक्राईमनामारमाबाई नगरात डोक्यात लाटणे मारून महिलेची केली हत्या

रमाबाई नगरात डोक्यात लाटणे मारून महिलेची केली हत्या

Google News Follow

Related

२५ वर्षीय महिलेच्या डोक्यात लाटण्याने प्रहार करून हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी घाटकोपर रमाबाई कॉलनी येथे घडली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी ५० वर्षीय महिलेला याप्रकरणी अटक केली आहे. घर बांधण्यासाठी दिलेल्या पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रेखा धोबी (२७) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. रेखा ही पती आशिष आणि दोन मुलांसह घाटकोपर पूर्व रमाबाई कॉलनी या ठिकाणी राहण्यास होती. रेखाचा पती हा गवंडी काम करतो. त्याच परिसरात राहणारी आरोपी महिला ममता उके हिचे त्या परिसरात दोन खोल्या असून एक खोली तिने भाड्याने दिली आहे. दुसऱ्या खोलीचे काम करण्यासाठी रेखाचा पती आशिष याला तिने ४० हजार रुपये दिले होते. मात्र घराचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे ममता उके हिने पैसे परत करण्यासाठी आशिषकडे तगादा लावला होता.

हे ही वाचा:

‘राणीच्या बागेत दुर्मिळ प्राण्यांच्या नावाने १०६ कोटींचा घोटाळा’

सफाई कर्मचाऱ्याने टोचले इंजेक्शन; लहानग्याचा मृत्यू

आरोग्यसेविकांना ना पुरेसे वेतन, ना पेन्शन, ना विमा!

उत्तरप्रदेश निवडणुकीतील ‘M’ फॅक्टर

 

गुरुवारी सकाळी ७ वाजता ममता ही आशिष याला भेटण्यासाठी त्याच्या घरी आली. मात्र आशिष घरी नसल्यामुळे तिने पत्नी रेखा हिच्यासोबत वाद घालून तिला लाटण्याने मारहाण करून तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यात रेखा गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रेखा हिला ताबडतोब उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून ममता उके हिला हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा