23 C
Mumbai
Saturday, January 3, 2026
घरक्राईमनामामहिला वाहतूक पोलीसाने प्रसंगावधान राखले म्हणून...

महिला वाहतूक पोलीसाने प्रसंगावधान राखले म्हणून…

वाहन चालकाचे वाचवले प्राण

Google News Follow

Related

 मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक पोलीस विभागातील महिला कॉन्स्टेबलने एका कार चालकाचे प्राण वाचवले, कार चालकाला हृदय विकाराचा झटका आला होता. तिने वेळ न दडवता त्या चालकाला सीपीआर देऊन त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात हलविले आणि त्याचे प्राण वाचले. तिच्या या कौतुकास्पद कामगीरीमुळे मुंबई पोलिस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.

दीपाली मंडले असे या वाहतूक महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. दीपाली मंडले या मुंबई वाहतूक दलाच्या वडाळा वाहतूक विभागात कार्यरत आहे. सोमवारी वडाळा येथे पूजा जंक्शनवर कॉन्स्टेबल दिपाली मंडले कार्यरत होत्या. “चेंबूरहून अँटॉप हिलकडे जाणारी उत्तरेकडील वाहतूक सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ठप्प झाली होती.

मंडले म्हणाल्या की, “मला एका गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेला प्रवासी ड्रायव्हरच्या सीटकडे घाईघाईने येत असल्याचे दिसले. सुरुवातीला मला वाटले की तो ड्रायव्हरसोबत सीट बदलू इच्छितो. पण मला लवकरच लक्षात आले की काहीतरी गडबड आहे.

हे ही वाचा:

भारत काय बोलतो हे जग कान उघडून ऐकते

विधानसभा निवडणुका होतील तेव्हा पक्ष पूर्ण बहुमत मिळवेल

शरीरासाठी अमृतासारखा आहे गहू

वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती दिली

मंडले म्हणाल्या,  ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला होता.मंडले गाडीकडे धावल्या आणि ड्रायव्हरला गाडीच्या बाहेर आणले. त्याला रस्त्यावर झोपवून, तिने अपवादात्मक संयमाने आणि सावधगिरीने सीपीआर दिला. त्यानंतर तिने प्रवाशाला ड्रायव्हरला जवळच्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. तिच्या धाडसी कृतीमुळे त्याचा जीव वाचला.

मंडले म्हणाल्या की, वाहतूक पोलिसांना वाहतूक प्रशिक्षण शाळेत सीपीआर कसे द्यावे याचे प्रशिक्षण दिले जाते. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या धाडसाचे आणि दयाळूपणाचे कौतुक केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा