29 C
Mumbai
Friday, October 16, 2026
घरक्राईमनामामुंबईतील वरळी येथे धक्कादायक घटना, कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार

मुंबईतील वरळी येथे धक्कादायक घटना, कारमध्ये २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार

मुलगी दारुच्या नशेत असल्याचा गैरफायदा आरोपीने उठवला

Google News Follow

Related

ठाणे येथील दिघा गाव परिसरात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीवर वरळी येथे कारमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नोकरीचे प्रलोभन दाखवून दारूच्या नशेत अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एक स्वयंसेवी संस्था चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दिघा गावातील २४ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती , तिच्या काही मित्रांना याबाबत माहित होते. जोसेफ नावाचा मित्र नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करेल असे सांगून दोन मित्रांनी तिला खार येथे बोलावले या ठिकाणी जोसेफ हा देखील आला होता. एका हॉटेलमध्ये सर्वांनी मद्यपान केले.

हे ही वाचा:

भाजपावर खापर फोडत केजरीवालांनी केली ‘जेल भरो’ची घोषणा

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, सहा महिन्यात पाकव्याप्त काश्मीर भारतात

पुढील हंगामात हार्दिकचे ‘एका सामन्याच्या बंदी’ने स्वागत!

काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत

हॉटेल बंद झाल्यानंतर सर्वजण बाहेर पडले. या तरुणीचे मित्र निघून गेले आणि ती एकटीच खार स्थानकाच्या दिशेने चालली होती. याचवेळी दुचाकीवरून निघालेल्या जोसेफने तिला थांबवले आणि दुचाकीवर बसण्यास सांगितले. उशिरा झाल्याने लोकल बंद झाल्या असतील असे सांगून जोसेफने तिला आपल्यासोबत घेतले. दोघेही दुचाकीवरुन वरळी परिसरात आले आणि या ठिकाणी एका पार्किंग केलेल्या कारमध्ये जोसेफने नेल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे

दारूच्या नशेत असल्याचा गैरफायदा घेत जोसेफ याने कारमध्ये बलात्कार केला. विरोध केला असता त्याने मारहाण केल्याचे तिने म्हटले आहे. आरोपी जोसेफ याला पोलिसांनी अटक केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा