31 C
Mumbai
Tuesday, April 7, 2026
घरक्राईमनामाकुर्ल्याच्या भाभा रुग्णालयाच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयाच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

Google News Follow

Related

कुर्ला (प.) येथील पालिकेच्या भाभा रुग्णालयाच्या छतावर अँटीना काढण्यासाठी चढलेल्या कामगाराचा अचानक तोल गेल्याने खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. त्यामुळे रूग्णालय परिसरात खळबळ उडाली.

दरम्यान, मृत कामगाराचे नाव सागर कुमार (२८) असल्याचे समजते. याप्रकरणी रूग्णालय प्रशासन व स्थानिक पोलिसांकडून घटनाप्रकाराची चौकशी सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुर्ला भाभा हे पालिकेचे रुग्णालय कुर्ला व नजीकच्या परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी खूपच उपयुक्त, असे रूग्णालय आहे. या रुग्णालयात दिवस- रात्र रुग्णांची ये – जा सुरूच असते. या रुग्णालयात सध्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून अत्याधुनिक वायरलेस सिस्टम कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे.

हे ही वाचा:

राज्याचा आगामी अर्थसंकल्प नागपूरमधून

वसाहतवादी न्यायशास्त्र सोडा, मनू, कौटिल्य, बृहस्पतींचे न्यायशास्त्र अंगिकारा!

अकबर साजरा करायचा ख्रिसमस! मुघलांना सेक्युलर दाखवण्यासाठी आव्हाडांची धडपड?

गुन्हेगारांना पकडताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी

 

सोमवारी नेहमीप्रमाणे रुग्णालयाचे कामकाज सुरू असताना या रुग्णालयाच्या छतावरील भागात अँटिना काढण्यासाठी चढलेला सागर कुमार हा कामगार काम करीत होता. तिथून त्याचा अचानक तोल गेल्याने तो थेट खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
302,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा