20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरराजकारणवसाहतवादी न्यायशास्त्र सोडा, मनू, कौटिल्य, बृहस्पतींचे न्यायशास्त्र अंगिकारा!

वसाहतवादी न्यायशास्त्र सोडा, मनू, कौटिल्य, बृहस्पतींचे न्यायशास्त्र अंगिकारा!

Related

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुल नझीर यांचे परखड मत

मनू, कौटिल्य, बृहस्पती अशा महान विचारवंत आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वांनी जे न्यायशास्त्रातील नियम, कायदे विकसित केले त्यांच्या अभ्यासाकडे आता आपल्याला वळायला हवे, त्या न्यायशास्त्राचे भारताने अनुकरण करायला हवे आणि कायदेविषयक अभ्यासक्रमात त्याचा समावेश केला जावा, असे परखड आणि स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. अब्दुल नझीर यांनी व्यक्त केले आहे.

हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या निमित्ताने नझीर यांनी आपले हे स्पष्ट विचार मांडले.

या महान ऋषिमुनींनी व विचारवंतांनी न्यायशास्त्राविषयी जे धर्मग्रंथात नमूद केले आहे, त्याचा उल्लेख करत नझीर म्हणतात की, हे प्रयत्न चिकाटीने करावे लागतील, त्यासाठी बराच अवधी लागेल मात्र या प्रयत्नांमुळे भारतीय न्याय व्यवस्था पुनरुज्जीवित होऊ शकेल. शिवाय, आपल्या महान राष्ट्राची संस्कृती, समाज आणि पंरपरेशी मिळतीजुळती असेल. त्यामुळे स्वाभाविकच न्यायदान पद्धती अधिक सक्षम होईल.

कायदेविषयक अभ्यासात या प्राचीन न्यायशास्त्राचा समावेश करण्याविषयी भाष्य करताना न्या. नझीर म्हणतात की, सध्याची वसाहतवादी न्यायपद्धती ही भारतीय लोकमानसासाठी अजिबात सुयोग्य नाही. त्यामुळे न्यायपद्धतीचे, न्यायव्यवस्थेचे भारतीयीकरण व्हावे ही काळाची गरज आहे. हा वसाहतवादी न्यायपद्धतीची मानसिकता आपल्या देशातून उखडून टाकायला वेळ लागेल पण मी जे म्हटले आहे त्यामुळे या मुद्द्याचा सखोल अभ्यासाविषयी नक्कीच तुम्ही विचारमंथन सुरू करू शकता आणि विद्यमान वसाहतवादी न्यायपद्धतीला अव्हेरण्यासाठी पावले उचलू शकता.

हे ही वाचा:

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षांची निवड?

महात्मा गांधी अवमानप्रकरणी कालीचरण महाराजांवर गुन्हा

गुन्हेगारांना पकडताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी

राज्यसभा खासदार महेंद्र प्रसाद कालवश

 

न्यायाधीश नझीर उदाहरण देतात की, प्राचीन न्यायशास्त्रानुसार विवाह एक कर्तव्य आहे. विविध सामाजिक जबाबदाऱ्या जशा आपण निभावतो, त्याप्रमाणेच विवाह हे सुद्धा एक कर्तव्य आहे. पण वसाहतवादी किंवा पाश्चिमात्य न्यायपद्धतीमुळे विवाह ही एक तडजोड असल्याचे सांगण्यात आले आणि त्यातील जोडीदार स्वतःच्या हक्काचा विचार करू लागला. त्यामुळे कर्तव्याची भावना खुंटली आणि घटस्फोटांची संख्या प्रचंड वाढली.  अर्थशास्त्राच्या अनुशासन पर्वात हक्क किंवा अधिकार हा शब्दही अस्तित्वात नव्हता.

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मत व्यक्त केले की, वसाहतवादी न्यायव्यवस्थेच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवण्यासाठी कायद्याच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात आपल्या मनू, कौटिल्य, बृहस्पती अशा पूर्वजांनी कष्टाने विकसित केलेल्या न्याय तत्त्वांचा समावेश करावा असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अब्दुल नासीर यांनी व्यक्त केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा