28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरराजकारणअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षांची निवड?

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षांची निवड?

Google News Follow

Related

मंगळवार, २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा समारोप होणार आहे. अवघ्या पाच दिवसांच्या या अधिवेशनात शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा घाट ठाकरे सरकारने घातल्याचे समजत आहे. अध्यक्ष निवडीच्या नियमांमध्ये केलेले बदल घटनाबाह्य प्रक्रियेतून करण्यात आल्याचे राज्यपालांनी सांगितलेले असताना सरकार मात्र आवाजी मतदानावर अध्यक्षांची निवड करण्यावर ठाम आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष नव्याने पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्षपद हे रिक्त होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्या नंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. अशावेळी भारतीय जनता पार्टीचे १२ आमदार निलंबित करून अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा घाट ठाकरे सरकार मार्फत घालण्यात आला होता. पण आता सरकारचे हे मनसुबे राज्यपालांनी उधळून लावल्याचे पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा वापर भारतविरोधी राष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी

१५-१८ वयोगटातील मुलांची १ जानेवारीपासून करा नोंदणी

महात्मा गांधी अवमानप्रकरणी कालीचरण महाराजांवर गुन्हा

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

राज्य सरकारने त्यांच्या सोयीनुसार अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत बदल करून आवाजी मतदानाने अध्यक्षाची निवड करण्याची नवीन नियमावली तयार केली. पण नियम बदलण्याची ही प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटले आहे. पण तरी देखील ठाकरे सरकार मात्र आपण कोणतेही घटनाबाह्य कृत्य केले नसल्याचे सांगताना आवजी मतदानाने अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यावर ठाम आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक उरकून घेण्याचा ठाकरे सरकारचा मनसुबा दिसत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा अखेरच दिवस चांगलाच गाजणार असे दिसते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा