27.9 C
Mumbai
Saturday, July 4, 2026
घरराजकारणगुजरातमध्ये दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आठ जणांना बेड्या

गुजरातमध्ये दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आठ जणांना बेड्या

एटीएसने केली कारवाई, गुजरातमध्ये दहशवादी कारवायांना देत होते बळ

Google News Follow

Related

गुजरात दहशतवादविरोधी पथकाने बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेच्या कथित आठ सदस्यांना अटक केली आहे. या आरोपींवर गुजरातमध्ये संघटनेचे सक्रिय दहशतवादी जाळे उभारून तिच्या कारवायांना चालना देण्याचा आरोप आहे.

गुजरात एटीएसच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेसाठी सक्रियपणे काम करत होते आणि राज्यात कार्यरत नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न करत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोणताही मोठा दहशतवादी कट राबवण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली.

सात आरोपींना गुजरातमधील विविध जिल्ह्यांतून, तर एका आरोपीला शेजारच्या मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. बनासकांठा येथून तीन, पाटण येथून तीन, नवसारी येथून एक आणि मध्य प्रदेशातील देवास येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

हे ही वाचा:

सिंधू जल करार अद्याप स्थगितच!

सिया गोयल, चेतन चौधरीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

युक्रेनवर रशियाचा भीषण क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात न्यूझीलंड दौऱ्यावर

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

अहमद अब्दुल्ला गाजीवाला उर्फ अबू उबैदा (वय १९), भगाल, पालनपूर, बनासकांठा.

इब्राहिम मोहम्मद हुसेन घाघा उर्फ अबू हमजा (वय ३०), भगाल, पालनपूर, बनासकांठा.

मुदस्सिर अब्दुल्ला गाजीवाला उर्फ अबू आया (वय २२), भगाल, पालनपूर, बनासकांठा.

झकारिया दुराणी मोहम्मद अम्मार घाघा उर्फ इब्न अम्मार उर्फ झकारिया पालनपुरी (वय २१), जामिया अबुल हसन मदरसा, खडीयासणा, सिद्धपूर, पाटण.

मुफ्ती फौजान इस्माईल दौवा उर्फ मुफ्ती साहेब (वय ४०), जामिया अबुल हसन मदरसा, खडीयासणा, सिद्धपूर, पाटण.

मोहम्मद अमीन शेरा उर्फ अमीन पालनपुरी (वय २१), जामिया अबुल हसन मदरसा, खडीयासणा, सिद्धपूर, पाटण.

मोहम्मद अब्दुल रहमान सावडी उर्फ मोहम्मद पालनपुरी उर्फ अबू उनीसा (वय २२), जामिया रहमानिया खांभिया, अंभेटा, चिखली, नवसारी.

बिलाल दुराणी मोहम्मद अम्मार घाघा उर्फ अबू दुजाना उर्फ अबू सुफियान उर्फ अबू जुंदाल उर्फ उमर बिन खत्ताब (वय १८), वारसी नगर, देवास, मध्य प्रदेश.

एटीएसने सर्व आठ आरोपींविरुद्ध एटीएस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, १९६७ (UAPA) अंतर्गत कलम १३ (बेकायदेशीर कृत्यांची शिक्षा), १७ (दहशतवादी कृत्यांसाठी निधी उभारणे), १८ (कट रचणे), ३८ (दहशतवादी संघटनेचे सदस्यत्व) आणि ३९ (दहशतवादी संघटनेला मदत करणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याशिवाय भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १४८ आणि ६१ देखील लागू करण्यात आले आहेत. एटीएसच्या माहितीनुसार, कलम १४८ हे कलम १४५ अंतर्गत शिक्षापात्र गुन्हा करण्यासाठी कट रचण्यासंबंधी आहे, तर कलम ६१ हे गुन्हेगारी कटाशी संबंधित आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कलम १४७ हे भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, युद्ध पुकारण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यासाठी प्रोत्साहन देण्याशी संबंधित आहे.

गुजरात एटीएसने म्हटले आहे की, आरोपी जैश-ए-मोहम्मदच्या वतीने गुजरातमध्ये सक्रिय जाळे उभारून या बंदी घातलेल्या संघटनेच्या कारवायांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा