विनय सहस्रबुद्धे यांची शनिवारी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या अध्यक्षपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली. त्यांनी माजी काँग्रेस खासदार कुमार केतकर यांचा पराभव केला. सहस्रबुद्धे यांना ३४९ मते मिळाली, तर केतकर यांना अवघी १४७ मते मिळाली.

मतदानापूर्वी ही निवडणूक मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय आणि धर्मादाय आयुक्तांकडेही झाली होती. मात्र, मतदानानंतर डॉ. सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्व प्रमुख पदांवर दणदणीत विजय मिळवत संपूर्ण निवडणुकीत बाजी मारली.
मानद सचिवपदी विवेक वसंत गणपुळे यांची ३५२ मतांसह निवड झाली.
उपाध्यक्षपद :
रमेश पतंगे – ३२९ मते
नितीश भारद्वाज – ३२८ मते
चंद्रप्रकाश द्विवेदी – ३२७ मते
संजय देशमुख – ३२३ मते
व्यवस्थापन समिती:
प्राची मोघे – ३४२ मते
माधव भांडारी – ३३९ मते
मल्हार कुलकर्णी – ३३३ मते
प्रमोद बापट – ३२९ मते
व्ही. एम. चक्रवर्ती – ३२४ मते
राजेश बेहरे – ३२१ मते
छाननी समिती :
स्नेहा नागरकर – ३७० मते
अभिजित मुळे – ३६२ मते
माधवी नरसाळे – ३६२ मते
उमंग काळे – ३५८ मते
अमोल जाधव – ३४९ मते
मल्हार गोखले – ३४८ मते
दत्तात्रय पंचवाघ – ३४४ मते
एकूणच, डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, व्यवस्थापन समिती आणि छाननी समिती अशा सर्व महत्त्वाच्या पदांवर विजय मिळवत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.







