26 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरक्राईमनामावरळी कोळीवाड्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू

वरळी कोळीवाड्यात दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू

Google News Follow

Related

वरळी कोळीवाड्यातील डेपोत मंगळवारी हृदयद्रावक घटना घडली. त्यात दोन बसच्या मध्ये चिरडून एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्या भागात संतापाचे वातावरण आहे. दुपारी १२ वाजता ही घटना घडली.

सदर मुलगी ही दोन बसच्या मधून जात असताना अचानक पुढील बस चालकाने मागे घेतली पण त्याला तो अंदाज आला नाही. त्यामुळे दोन्ही बसच्या मध्ये अडकून या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दादर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक वाणी या घटनास्थळी दाखल असून घटनेचा पंचनामा, तसेच मृतदेह ताब्यात देण्याची  प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास; शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

फडणवीसांच्या आरोपांना मलिकांचे आरोपांनी उत्तर

जनधन खाती वाढली आणि गुन्हे घटले!

पिचलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता ठाकरे सरकारची अवमान याचिका

 

वरळी कोळीवाड्यातील या डेपोत मोठ्या संख्येने बसेस येत असतात पण तेथे असलेल्या अपुऱ्या जागेमुळे बसेस वळविण्यास जागा उपलब्ध नसते.  शिवाय, बसचालकही अनेकवेळा बेदरकारपणे गाडी चालवत असल्यामुळे असे अपघात होण्याची शक्यता वाढलेली आहे. बसेस रिव्हर्स घेतल्या जात असताना बऱ्याचवेळा तिथे वाहक बाहेर उभा नसतो त्यामुळे बसचालकाकडून असे अपघात होण्याची शक्यता वाढते. डेपोच्या बाहेर फळवाले, भाजीवाले मोठ्या संख्येने उभे असतात. त्यामुळे रस्ता कमी पडू लागला आहे. त्यातच नेहमीच्या टॅक्सी व शेअर टॅक्सींची गर्दीही तिथे असते. दुचाकींची मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंग होत असल्यामुळे बसस्टॉपवर उभ्या असलेल्या लोकांनाही रस्त्यावर येऊन उभे राहावे लागते. बसेस बाहेर उभ्या करण्यासही जागा शिल्लक नसते. अशा सगळ्या समस्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर विभागात संतापाचे वातावरण आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासन कोणती काळजी घेणार आहे, असा सवाल लोक विचारत आहेत. हे अनधिकृत भाजीवाले, अनधिकृत पार्किंग तिथून हलविण्यात येणार का? असाही प्रश्न विचारला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा