33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरविशेषमुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास; शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास; शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

Related

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला असून हा त्रास आणखी त्रास बळावल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला आहे. मुख्यमंत्र्यांवर येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.

गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया होणार असून डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचे ‘टीव्ही ९’ ने सूत्रांच्या हवालाने सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या सोमवारी गिरगाव येथील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती.

हे ही वाचा:

जनधन खाती वाढली आणि गुन्हे घटले!

नवाब मलिक कुटुंबाला कशी मिळाली ३ एकरची जमीन अवघ्या ३० लाखाला

‘अभिनंदन राहुलजी, तुम्ही जगातील कमिशनचा रेकॉर्ड मोडला आहे’

‘अनिल परब हे परिवहन मंत्री नव्हे ठाकरे परिवार मंत्री’

मागील अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या असून दिवाळीनिमित्त वर्षा बंगल्यावर पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणे देखील टाळले होते. त्यांचा त्रास सध्या कमी होत नसल्यामुळे पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा