मित्रांमध्ये सुरू असलेल्या मस्करीची कुस्करी झाल्याची घटना बिहारमध्ये घडली. मित्रांनी गमती जमतीत मोमो खाण्याची पैज लावल्यानंतर प्रमाणाबाहेर मोमो खाल्ल्याने एका २५ वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागल्याची घटना बिहारमधील सिवान जिल्ह्यात घडली. या दुर्घटनेनंतर तरुणाच्या वडिलांनी यामागे तरुणाच्या मित्रांचा कट असल्याचा आरोप केला आहे.
बिपिन कुमार पासवान असे या तरुणाचे नाव असून तो मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात काम करत होता. गुरुवारी नेहमीप्रमाणे पासवान त्याच्या दुकानावर गेला. त्यानंतर तो त्याच्या मित्रांना भेटला. त्यानंतर या मित्रांमध्ये सर्वांत जास्त मोमोज कोण खातो, यावर पैज लागली. पासवानच्या मित्रांनी त्यालाही सर्वाधिक मोमो खाण्याचे आव्हान दिले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यात रुपया ठरला खणखणीत…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला अतिशय कणखर नेतृत्व लाभलं
नशीब असावं तर असं! लॉटरी खरेदी केल्यावर तासाभरात क्लर्क झाला करोडपती
हा सर्व प्रकार हसतखेळत सुरू असताना अचानक पासवान बेशुद्ध पडला आणि तिथेच कोसळला. तोपर्यंत त्याने खूप मोमो खाल्ले होते. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. मात्र आपल्या मुलाला विष दिल्याचा आरोप तरुणाच्या वडिलांनी केला आहे. या मित्रांनी जाणुनबुजून सर्वाधिक मोमो खाण्याची पैज लावली आणि त्यातून माझ्या मुलाला विष पाजले, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलिस या घटनेचा तपास करून असून शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांना पुढील तपासाची दिशा मिळणार आहे.







