प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपास सुरू असून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. झुबीन यांचे बँडमेट शेखर ज्योती गोस्वामी यांनी गंभीर आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, झुबीन यांचे व्यवस्थापक आणि सिंगापूरमधील कार्यक्रमाच्या आयोजकाने त्यांना विष दिल्याचा खळबळजनक दावा गोस्वामी यांनी केला आहे. झुबीनच्या मृत्यूप्रकरणी आसाम पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांपैकी गोस्वामी हे देखील एक आरोपी आहेत. त्यांनी म्हटले आहे की आरोपींनी हे कृत्य लपवण्यासाठी परदेशी ठिकाण निवडले.
झुबीन गर्ग यांच्या मृत्यू प्रकरणी गोस्वामी यांच्या व्यतिरिक्त, पोलिसांनी गायकाचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, कार्यक्रमाचे आयोजक श्यामकानु महंता आणि संगीतकार अमृतप्रव महंता यांना अटक केली आहे. बॉलिवूड आणि आसामी गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले झुबीन यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमधील एका बेटाजवळ स्कुबा डायव्हिंग दरम्यान निधन झाले. ते बोटीतून फिरायला गेले असताना त्यांच्यासोबत गोस्वामी आणि महंत दोघेही होते. ईशान्य भारत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी सिंगापूरला गेले होते.
एसआयटीने सादर केलेल्या अटकेच्या कारणांनुसार, गोस्वामी यांनी आरोप केला आहे की, सिंगापूरमधील पॅन पॅसिफिक हॉटेलमध्ये झुबीन यांच्यासोबत राहिलेला सिद्धार्थ शर्मा हा गर्ग यांच्या मृत्यूपूर्वी संशयास्पद वागला. प्रवासादरम्यान शर्मा याने जहाजाच्या खलाशांकडून जबरदस्तीने ताबा घेतला, ज्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला. गोस्वामी यांनी असेही उघड केले की झुबीन यांचे व्यवस्थापक शर्मा याने तन्मय फुकन (सिंगापूरमधील आसाम असोसिएशनचे सदस्य) यांना पेयांची व्यवस्था करू नये असे सांगितले होते, कारण तो पेये पुरवणार होता. पुढे ते म्हणाले की, झुबीन यांना पोहताना श्वास घेण्यास त्रास होत होता तेव्हा शर्मा ओरडत होता, त्याला जाऊ द्या. झुबीन यांच्या तोंडातून आणि नाकातून फेस येत होता, परंतु शर्मा यांनी त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आणि काळजीचे कारण नसल्याचे म्हटले.
हे ही वाचा :
कफ सिरप सेवनामुळे लहान मुलांच्या मृत्युनंतर औषध नियंत्रक निलंबित
‘या’ प्रयत्नांसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे स्वागत! काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
नामिबिया आणि झिम्बाब्वेची २०२६ टी२० विश्वचषकात धडक!
ऑपरेशन सिंदूर: एफ- १६, जेएफ- १७ विमानांसह पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली!
इतर साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाला शर्माच्या संशयास्पद वर्तनाला दुजोरा मिळाला. शर्मा त्याच्या कृतींसाठी कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकला नाही. झुबीन यांची पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांनी म्हटले आहे की त्यांना या घटनेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. तसेच त्यांनी दावा केला आहे की, गर्ग यांना कधीही हृदयविकाराचा त्रास नव्हता. त्या दिवशी गर्ग खूप थकले होते. सर्वांना माहित होते की त्यांना काही आजार आहेत, झटके येत होते. डॉक्टरांनी त्यांना पाण्याजवळ किंवा आगीजवळ जाऊ नका असे सांगितले होते. तरीही, त्यांना बोटीवर नेण्यात आले आणि लाईफ जॅकेटशिवाय पोहण्याची परवानगी देण्यात आली.







