22 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरधर्म संस्कृतीश्री देव रवळनाथ मंदिराचा पहिला वर्धापन दिन भक्तिभावात साजरा होणार

श्री देव रवळनाथ मंदिराचा पहिला वर्धापन दिन भक्तिभावात साजरा होणार

Google News Follow

Related

पेडणे तालुक्यातील श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्याश्री देवी भगवती रवळनाथ तदानुशांगिक देवालय समिती, पेडणे–गोवा यांच्या वतीने श्री देव रवळनाथ मंदिराचा पहिला वर्धापन दिन मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत भक्तिभावपूर्ण व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. प्रभू रवळनाथांच्या कृपाछायेखाली उभ्या राहिलेल्या या मंदिराच्या पहिल्याच वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पावन सोहळ्यानिमित्त सकाळपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापन दिनाची सुरुवात सकाळी ८.०० वाजता लघुरुद्र स्वाहाकाराने होणार आहे. त्यानंतर पोडशोपचार पूजा विधी, धुपारती व महाआरती संपन्न होईल. या सर्व धार्मिक विधींनंतर भाविकांसाठी दुपारी महाप्रसाद ठेवण्यात आला असून, प्रभू श्री रवळनाथांच्या कृपेचा प्रसाद सर्वांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सायंकाळी भक्तिरस आणि शास्त्रीय संगीतातील रंगत वाढवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सायंकाळी ५.०० वाजता गोव्याच्या सुप्रसिद्ध तबला वादिका कु. गौतमी आंगणकर यांचा तबला सोलो कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या तालसाधनेतून उपस्थितांना एक आगळाच आध्यात्मिक आनंद अनुभवायला मिळणार आहे.

सायंकाळी ७.०० वाजता शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा विशेष कार्यक्रम होणार असून, त्यात श्री. दुगेश गुरुदेव न्यागी व श्री. कर्तिकेश गुरुदेव न्यागी यांचे भावपूर्ण गायन सादर होणार आहे. या गायनाला तबल्यावर श्री. संकेत खळप, हार्मोनियमवर श्री. प्रसाद गावस आणि पखवाजावर श्री. किशोर तेली साथसंगत करणार आहेत.

रात्री ९.०० वाजता प्रभू श्री रवळनाथांच्या साक्षीने दीपमाळा, ढोल-ताशांचा निनाद आणि जयघोषात पालखी उत्सव साजरा होणार आहे.

या ऐतिहासिक पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शन, पूजन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समिती, पेडणे–गोवा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा