31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरधर्म संस्कृती'राम मंदिर चौकात उभारलेला शंभर फुटी भगवा ध्वज प्रेरणा देत राहील'

‘राम मंदिर चौकात उभारलेला शंभर फुटी भगवा ध्वज प्रेरणा देत राहील’

संभाजी भिडे गुरुजींनी केले वक्तव्य

Google News Follow

Related

सांगली मधील श्रीराम मंदिर चौकात हिंदू गर्जना सभे वेळी माजी नगरसेविका ऍड.स्वाती शिंदे यांनी शिवरायांचा परम पवित्र भगवा ध्वज राम मंदिर चौकात उभा करून चौक सुशोभीकरण करणार अशी घोषणा केली होती. ऍड. स्वाती शिंदे आणि नितीनराजे शिंदे यांच्या संघर्षमय प्रयत्नातून राममंदिर चौकात, गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या हस्ते भगवा ध्वज फडकवला.

या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आशीर्वादाने माजी नगरसेविका अँड. स्वाती शिंदे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अविनाश बापू सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, शेखर इनामदार, समित कदम, महेंद्र चंडाळे, मनोहर सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बोलताना संभाजीराव भिडे गुरुजी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर पराक्रमाची पराकाष्ठा करून मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. पराक्रमाची ही शौर्यगाथा जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी बलिदान देत भगवा ध्वज फडकवत ठेवला. राम मंदिर चौकात उभारण्यात – आलेला १०० फुटी भगवा ध्वज उगवत्या पिढीला प्रेरणास्थान ठरेल.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, राम मंदिर चौकातील भगव्या झेंड्याला विरोध करणाऱ्या जिहाद्यांनो वाकडी नजर करून बघाल तर शिवभक्त तुमचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाहीत. भगव्यासाठी नगरसेविका स्वातीताई शिंदे व माजी आमदार नितीन शिंदे यांनी चिकटीनं केलेला पाठपुरावा प्रसोसनीय आहे.

हे ही वाचा:

पहिला ग्रीन बॉण्ड बीएसईवर सूचीबद्ध

मीरा राजपूत ने शेअर केले सुंदर फोटो

यूनुस यांच्या राजवटीत तुरुंग झाले छळछावण्या

स्मृती इराणी यांनी केले भाजपा संकल्पाचे कौतुक

यावेळी बोलताना हिंदू एकता आंदोलन माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, राम मंदिर चौकात भगवा लावण्यासाठी जिहाद्यांकडून टोकाचा विरोध झाला. राम मंदिर चौकातील झेंड्याचे हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाची विधी पूजा करून मंत्र उच्चार द्वारे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव, मनोज साळुंखे, दत्तात्रय भोकरे, प्रसाद रिसवडे, रवींद्र वादवने, गजानन मोरे, सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार,अवधूत जाधव, अरुण वाघमोडे, गजानन माने, अरविंद येतनाळे, सुमित शिंगे, विजय दादा कडणे, राहुल बोळाज, हनुमंत पवार, संभाजी भोसले, श्रीहरी माळी, सुनील तिवले, सौ. गीतांजली ढोपे पाटील, सौ.सुनिता बेलवलकर, सौ छाया हक्के, सौ.स्मिता पवार आदी उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा