29.6 C
Mumbai
Tuesday, October 13, 2026
घरधर्म संस्कृती‘हिंदूंच्याच दुकानातून बिर्याणी खरेदी करा’ बंगालमध्ये लागले पोस्टर

‘हिंदूंच्याच दुकानातून बिर्याणी खरेदी करा’ बंगालमध्ये लागले पोस्टर

दुर्गापूजेपूर्वी पोस्टर्सची चर्चा

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी शहरात दुर्गापूजेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या पोस्टरवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘बिर्याणी खा, पण हिंदूंच्या दुकानातून’ आणि ‘मांस हिंदूंच्या दुकानातून खरेदी करा’, असे आवाहन करणारे पोस्टर शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. हिंदू जागरण मंच या स्थानिक संघटनेने ही पोस्टरबाजी केली आहे.

सिलीगुडीतील भारतनगर परिसरातील तरुण तीर्थ क्लबच्या दुर्गापूजा मंडपाच्या आसपासच्या भिंतींवरही ही पोस्टर लावण्यात आली आहेत. या ठिकाणापासून पश्चिम बंगालचे पर्यटनमंत्री आणि सिलीगुडीचे आमदार शंकर घोष यांचे निवासस्थान जवळ आहे. शहरातील इतर दुर्गापूजा मंडपांजवळही पोस्टर दिसून आल्याचे वृत्त आहे. या पोस्टरवर हिंदूंच्या मालकीच्या दुकानांतून मांस, बिर्याणी आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही पोस्टरवर विक्रेत्याची धार्मिक ओळख जाणून घेऊनच खरेदी करण्याचा संदेशही देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

निवडणूक आयोगाविरोधातील इंडी आघाडीच्या याचिकेत १४ त्रुटी

‘दीपस्तंभ’ची त्या मुलींना साथ, ‘भारतीय स्त्री शक्ती’चा मदतीचा हात

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या गुलाम मोहम्मदचे घर जप्त

काँग्रेस खासदार बिमोल अकोईजाम यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा

हिंदू जागरण मंचचे प्रतिनिधी अभिषेक दास यांनी पोस्टर लावल्याची कबुली दिली आहे. ही मोहीम केवळ भारतनगरपुरती मर्यादित नसून शहरातील विविध दुर्गापूजा मंडपांजवळ पोस्टर लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेचा उद्देश हिंदू समाजात एकता निर्माण करणे आणि हिंदू व्यावसायिकांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देणे हा असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. हिंदूंच्या मालकीच्या दुकानांतून खरेदी केल्यास स्थानिक व्यापाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला मदत होईल, असा युक्तिवादही संघटनेच्या प्रतिनिधींनी केला आहे. संघटनेने ही मोहीम कोणावरही बंधन घालण्यासाठी नसून केवळ आवाहन असल्याचे स्पष्ट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा