31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरधर्म संस्कृतीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणजे 'राष्ट्रपिता'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणजे ‘राष्ट्रपिता’

दिल्ली मशिदीच्या धर्मगुरूंनी दिली उपाधी

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्ममार्तंडांशी भेट घेतली. दिल्लीतील मशिदीला भेट देऊन तेथील धर्मगुरुंशी त्यांनी संवाद साधला.

मोहन भागवत यांनी उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे ते प्रमुख आहेत. त्यावेळी इलियासी यांनी भागवत यांना राष्ट्रपिता अशी उपाधी दिली. त्यामुळे देशभरात त्याची चर्चा सुरू झाली आहे.

इलियासी म्हणाले की, आपला डीएनए सारखाच आहे. केवळ देवाची उपासना करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. जवळपास तासभर या दोघांमध्ये चर्चा सुरू होती.

इलियासी म्हणाले की, या भेटीमुळे देशात एक वेगळा संदेश जाईल. आम्ही या भेटीदरम्यान अगदी कुटुंबाप्रमाणे चर्चा केली. आमच्या आमंत्रणावरून ते इथे आले ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मोहन भागवत हे मदरशात गेले आणि तिथेही त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

हे ही वाचा:

दसरा मेळावा की विसरा मेळावा?

पुण्यातील ११० वर्ष जुन्या रूपी बँकेला टाळे

एबीजी शिपयार्डचे माजी सीएमडी ऋषी अग्रवाल यांना अटक

गेहलोत यांचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत; नवा मुख्यमंत्री कोण

 

कर्नाटकातील हिजाब आंदोलन आणि नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर देशभरात बदललेले वातावरण पाहता ते बदलण्याच्या उद्देशाने मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंशी भेटी केलेल्या आहेत. आरएसएसचे प्रवक्ते सुनील आंबेकर म्हणाले की, विविध जातीपंथांमध्ये सुसंवाद राहावा यासाठी या ही नियमित प्रक्रिया आहे.

२२ ऑगस्टला भागवत यांनी पाच मुस्लिम धर्मगुरूंची भेट घेतली आणि देशातील वातावरणाबद्दल चर्चा केली. त्यावरून दोन्ही पक्षांनी कोणती भूमिका घ्यायला हवी याविषयी चर्चा झाली. या बैठकीला माजी निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरेशी उपस्थित होते. ते म्हणाले की, ७५ मिनिटांच्या या बैठकीत भागवत यांनी देशातील परिस्थितीबद्दल गंभीर असल्याचे सांगितले. देशातील हे वातावरण अजिबात योग्य नाही. एकमेकांच्या सहकार्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही, असे भागवत यांनी सांगितल्याचे कुरेशी म्हणाले.

भागवत यांनी गौहत्येचा मुद्दाही उपस्थित केला. ज्यामुळे हिंदूमध्ये नाराजी असते याची विशेष नोंद त्यावेळी घेण्यात आली. भागवत यांनी ‘काफिर’ या शब्दाचा वारंवार वापर होत असल्यामुळेही हिंदूंमध्ये नाराजी असल्याचे सांगितले. कुरेशी यावर म्हणाले की, अशा शब्दांचा वापर थांबवला गेला पाहिजे.

मुस्लिमांना जिहादी आणि पाकिस्तानी म्हटले जात असल्याबद्दल मुस्लिम धर्मगुरूंनी सांगितले. त्यावर भागवत यांनी आपला डीएनए एकच असल्याचे सांगत बहुसंख्य मुस्लिम हे धर्मांतरित आहेत, अशी टिप्पणी केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा