“संमिश्र संस्कृती” ! हा शब्द आपल्या राज्य घटनेच्या अनुच्छेद ५१ (क) (च) मध्ये वापरला आहे. “आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे” – हे नागरिकांचे मुलभूत कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले आहे. इथे थोडा विचार करावा लागेल.
काय आपली संस्कृती “संमिश्र” आहे ? ! ही कुठली “संमिश्र” संस्कृती ? इथली हजारो वर्षांची प्राचीन , आणि तरीही अजूनही जिवंत असलेली संस्कृती – निःसंशय एकच आहे, ती म्हणजे हिंदू संस्कृती. अर्थात, हिंदू संस्कृतीत विविधता अफाट आहे. अनेक विभिन्न विचारधारा, तत्त्वज्ञानाच्या अनेक शाखा, अनेक देवदेवतांची उपासना करणारे असंख्य पंथ, उपपंथ, अनेक उपासना पद्धती, … हे सर्व हिंदू संस्कृतीत समाविष्ट आहे.
यामध्ये भक्तीपासून निरीश्वरवादापर्यंत, सगुणोपासनेपासून निर्गुण उपासनेपर्यंत, अद्वैतापासून द्वैतापर्यंत, ……..अनेक विचारधारा, असंख्य प्रकार येतात. पण ते सगळे “हिंदू संस्कृती” या एकाच मूळ संस्कृतीची विभिन्न अंगे आहेत. ही संस्कृती ज्याला Homogeneous म्हणता येईल, अशी आहे. Heterogeneous नव्हे.
१. “मिश्रण” म्हटले, की त्यात Heterogeneous गोष्टी येतात. त्यांचा आपसात काहीही संबंध नसतो, ताळमेळ नसतो. त्यात कित्येकदा अगदी विरुद्ध धर्मी घटकही येतात.
२. दुसरे म्हणजे, “मिश्रणा”तील घटक नेहमी, कायम, एकमेकापासून वेगळेच राहतात. त्यांच्यातील वेगळेपणा केवळ एकमेकासोबत कितीही काळ राहण्याने नष्ट होत नाही. (रासायनिक संयुगांमधे मूळ घटकांचे स्वरूप बदलून एक नवीनच पदार्थ तयार होतो. मिश्रणात तसे होत नाही. मूळ घटक वेगळेच राहतात.)
३. हिंदू संस्कृतीतील अंतर्गत विविधता – आणि ती सर्व विविधता मिळून तयार झालेली एक वैविध्यपूर्ण संस्कृती – ही Homogeneous आहे, एकजीव, एकरस आहे.
४. परकीय आक्रमकांकडून या भूमीत आलेले, तलवारीच्या, छळाच्या, बळाच्या, आमिषे -प्रलोभनांच्या जोरावर इथे जबरीने घुसलेले, लादले गेलेले धर्म – मुस्लीम , ख्रिश्चन …..हे इथल्या मूळ हिंदू संस्कृतीचा (ती कितीही वैविध्यपूर्ण असली, तरीही ) भाग नाहीत. त्यांचा समावेश करून तयार झालेला पदार्थ Homogeneous नसून Heterogeneous बनतो. तो मूळ संस्कृतीशी एकजीव होत नाही. मूर्तिभंजक आणि मूर्तिपूजक हे एका संस्कृतीचा भाग असू शकत नाहीत.
हे ही वाचा:
५. उदाहरणार्थ इस्लाम. परकीय मुस्लीम आक्रमक इथे ११००-१२०० पासून आले, पण त्यांच्यातील वेगळेपणाची, जेतेपणाची, आक्रमकतेची भावना थेट १९४७ पर्यंत तशीच राहिली. मुस्लीम बहुलतेच्या आधारावर त्यांनी देशाचा मोठा भाग तोडून, वेगळा करून घेतला. यातून त्यांनी हेच दाखवून दिलेय, की असले Heterogeneous कृत्रिम मिश्रण टिकू शकत नाही. त्यातील घटक वेगळेच राहतात. कायम.
६. जी गोष्ट सात आठशे वर्षात होऊ शकली नाही, ती साठ सत्तर, ऐंशी किंवा अगदी शंभर वर्षात सुद्धा होईल, असे मानणे हा मूर्खपणा आहे, जो हिंदूच करू शकतात. धार्मिक आधारावर फाळणी झाल्यानंतरही जे मुस्लीम इथे राहिलेत, ते इथल्या मूळ (हिंदू) संस्कृतीशी एकरूप, एकजीव होण्यासाठी नव्हे. ते राहिले, कारण त्यांना १९४७ मध्ये जे मिळाले, तेव्हढ्यावर समाधान नाही, त्यांना आणखी हवे आहे, म्हणून. हे न ओळखता, अजूनही तथाकथित “संमिश्र” संस्कृती चे स्तोम माजवून छद्म निधर्मितेच्या नावाखाली त्यांचे लाड करणे थांबवावेच लागेल.
७. ओढूनताणून बांधलेली विळ्या भोपळ्याची कृत्रिम मोट टिकू शकत नाही. आपल्याला राष्ट्र म्हणून जी विविधता, जे सौंदर्य हवे आहे, ते Homogeneous च हवे. Heterogeneous नव्हे, कारण ते टिकत नाही. हे इथे या देशात आम्हाला १००० वर्षांच्या अनुभवाने शिकवले आहे. त्याच त्याच जुन्या चुका वर्षानुवर्षे , नव्हे हजारो वर्षे करीत राहण्याची काहीही गरज नाही. Have we still not learnt the bitter lesson ?? कधी शिकणार आपण ?
८. त्यामुळे Once for all, एकदाचे हे तथाकथित “संमिश्र” संस्कृतीचे खूळ, हे थोतांड फेकून द्यावे लागेल. ह्या देशाची संस्कृती ही निश्चितपणे “हिंदू संस्कृती”च आहे, हे मान्य करण्यात कसली अडचण आहे ? कोणाची लाज / भीती आहे ?
“इक्ष्वाकुनाम इयं भूमिः !! ” – रामायण. हो, निर्भयपणे, गर्जना करून म्हणा, की ही श्रीरामाची, श्रीकृष्णाची, भगवान शिवाची भूमी आहे. डॉ. राम मनोहर लोहिया सारख्यांनी हे म्हटले आहे, की श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान शिव, हीच या भारतीय संस्कृतीची प्रतीके आहेत. लोहिया कोणी हिंदुत्ववादी नव्हते, की रा स्व संघवाले नव्हते. ते फक्त तर्कशुद्ध आणि खरे बोलणारे होते.
हिंदू संस्कृती ही आणि हीच इथली संस्कृती आहे. तिच्यात कुठलीही अशुद्ध भेसळ नाही. ती एकजिनसी, एकजीव, आहे. Homogeneous आहे. १२५ कोटी लोकांच्या घमन्यांतून ती वाहतेय. ती जिवंत आहे. गर्वसे कहो हम हिंदू है.
We, the people of India, MEANS – HINDUS !! Yes, it is as simple as that.
कोणाला आवडो, न आवडो, वस्तुस्थिती हीच आहे, की आमची संस्कृती हिंदू संस्कृती आहे. जे तिच्याशी एकरूप होऊ शकतात, केवळ त्यांचे च स्वागत आहे.
आत्ता हे सर्व आठवण्याचे कारण काय ?
आत्ताच हे आठवण्याचे कारण, म्हणजे नुकतीच केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेली राष्ट्रीय गान “वंदे मातरम” संबंधी अधिसूचना. १९३७ साली मुस्लीम तुष्टीकरणाच्या हेतूने, कॉंग्रेसने वगळलेल्या कडव्यांसह संपूर्ण सहा कडव्यांचे “वंदे मातरम” राष्ट्रीय गान म्हणून म्हटले जाणे, अनिवार्य करणारी अधिसूचना. केंद्रीय गृह मंत्रालयाचे मनःपूर्वक अभिनंदन.
होय, या गीतातील शेवटच्या चार कडव्यांत, अष्टभुजा देवीचे, मातेच्या स्वरूपातील स्तवन आहे. होय, आम्ही आमच्या मातृभूमीला “देवीस्वरूप” मानतो, तिची स्तुती, पूजा करतो. ही आमची, भारतीयांची संस्कृती आहे. त्यात बिघडले कुठे ? त्यात कोणाचे काही बिघडत असेल, तर १९४७ सालीच त्यासाठी जे द्यायचे ते देऊन झालेले आहे. आता नाही. इथून पुढे कसलीही तत्त्वशून्य, निरर्थक तडजोड नाही. हा देश हिंदूंचा आहे, इथली संस्कृती हिंदूंची आहे. जी एकरस. एकजीव, आहे. मिश्रण नव्हे. ती Homogeneous च आहे. Heterogeneous नव्हे. गर्वसे कहो हम हिंदू है. इस देशमे रहना होगा, वंदे मातरम कहना होगा ! दिलसे कहना होगा, जुल्म जबरदस्ती नही.







