केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी अशा शाळांकडून खुलासे मागवले – जणू शिक्षकांचा सन्मान करणे हा गुन्हा झाला! ही प्रतिक्रिया केवळ एका परंपरेविरुद्ध नाही, तर ती हिंदू संस्कृतीविरुद्ध असलेला पूर्वग्रह स्पष्ट करते. एका बाजूला बुरखा, मदरसे यांना ‘संविधानिक अधिकार’ म्हणून संरक्षण, आणि दुसऱ्या बाजूला गुरुपूजनासारख्या शुद्ध सांस्कृतिक उपक्रमांना ‘दडपशाही’ म्हणून हिणवणे – हेच कम्युनिस्टांचे दुटप्पी धोरण यानिमित्ताने उघड झाले.
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने म्हटले आहे की, हा कार्यक्रम रा.स्व. संघाच्या निगडित शाळांमध्ये केला गेला. ‘मुलांना निवृत्त शिक्षकांचे पाय धुण्यास भाग पाडणे निंदनीय आहे’.
शंकराचार्यांच्या स्मृतींनी पावन असलेले केरळला ‘देवभूमी’ असे पूर्वापार म्हटले जाते. मात्र, कम्युनिस्ट सरकारने राष्ट्रभक्तांचा उपमर्द आणि जिहाद्यांची पाठराखण करून केरळला ‘दक्षिणेचे काश्मीर’ बनवण्याचे ठरवले आहे काय अशी शंका येते. काश्मीर जसे मुस्लीमबहुल आहे आणि तिथे जसा फुटीरतावादी धर्मांध दहशतवाद माजला, तशीच परिस्थिती कम्युनिस्ट पक्षाला केरळमध्ये निर्माण करायची आहे, असे वाटते आहे. अर्थातच, केरळ काँग्रेसही याबाबतीत मागे नाही. २७ टक्के मुस्लिमांचा मसिहा कोण, यावरून या दोन्ही पक्षांची आपसांत स्पर्धा आहे.
कम्युनिस्टांच्या हिंदू द्वेषाची काही उदाहरणे
१) काही दिवसांपूर्वीच मुलं-मुली एकत्र झुंबा डान्स करतात हे इस्लाम विरोधी आहे म्हणत केरळमध्ये याविरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. केरळ सरकराने काही दिवसांपूर्वीच शाळांमध्ये झुंबा, एरोबिक्स, फिटनेस वर्कआऊट इत्यादी क्रीडा प्रकार सुरू केले होते. मात्र, कट्टरपंथी संघटनांनी याला विरोध करणारी मोहिम सुरू केली आहे. या विरोधात राज्याचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात विद्यार्थिनी हिजाब घालून झुंबा करत आहेत.
२) केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त राजभवनमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमात भारतमातेची प्रतिमा होती, म्हणून केरळच्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी’च्या सरकारने या कार्यक्रमावर चक्क बहिष्कार टाकला. तसेच राज्यपालांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये भारतमातेची प्रतिमा लावली, हे संविधानविरोधी आहे, अशा आशयाची तक्रार केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली. केरळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला भारतमातेची इतकी भीती, इतका तिरस्कार का?
३) ‘त्रावणकोर देवस्वोम बोर्ड तिरुवनंतपुरम’च्या वेल्लयानी भद्रकाली मंदिरामध्ये ७० दिवसांचा उत्सव असतो. हा उत्सव गेल्या ८५० वर्षांपासून सुरू आहे. उत्सवाला धार्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक आयाम आहेत. मात्र, हा उत्सव सुरू होण्यापूर्वीच केरळ पोलिसांनी देवस्थान समितीला आदेश दिले की, मंदिराची सजावट भगव्या रंगांच्या फुलांनी करू नये. भगव्या रंगांच्या फुलांऐवजी दुसऱ्या कोणत्याही रंगाची फुले चालतील.
पोलिसांच्या या आदेशाविरोधात देवस्थानने न्यायालयात याचिका दाखल केली, तर पोलीस प्रशासनाचे आणि केरळच्या कम्युनिस्ट सरकारचे म्हणणे होते, “भगव्या रंगाच्या फुलांची सजावट केली, तर त्या भगव्या रंगामुळे कायदा- सुव्यवस्थेवर ताण येतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. कारण, या भगव्या रंगामुळे एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जातात.” हिंदूंच्या मंदिरांची सजावट हिंदूंनी त्यांच्या आस्थेने केली, तर कोणत्या समाजाच्या भावना दुखावत होत्या, हे काय सांगायला हवे? ८५० वर्षांपासूनची मंदिराची ऐतिहासिक परंपरा सोडून द्या. कारण, भगव्या रंगामुळे केरळमधील काही म्हणजे अर्थातच बहुसंख्य मुस्लिमांच्या भावना दुखावतात, असा निर्णय देणारे हे केरळचे कम्युनिस्ट सरकार!
हे ही वाचा:
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला वाढदिवशीच अटक!
पंतप्रधान मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
४) केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील मुथुपिलक्कडु श्री पार्थसारथी मंदिराच्या कळसावर भगवा झेंडा डौलाने फडकत असायचा. मात्र, मंदिरावर भगवा झेंडा का, अशी याचिका हिंदूद्वेष्ट्यांनी न्यायालयात दाखल केली होती.
केरळमध्ये मुस्लीम लोकसंख्येचा दर सातत्याने वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी म्हणजे ३० जानेवारी रोजी ‘सेंटर फॉर पॉलिसी स्टडीज थिंक टँक’ने एक अहवाल प्रकाशित केला. त्याचे नाव होते, ‘रिलीजियस डेमोग्राफी इन इंडिया : राइजिंग रिलीजियस इम्बॅलन्स.’ या अहवालामध्ये हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर समुदायांच्या लोकसंख्येचे २००८ तेे २०२१ सालापर्यंतचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या अहवालानुसार केरळमध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढीचा स्फोट झाला आहे.
२०१६ साली ५४ टक्के हिंदू असलेल्या केरळमध्ये २ लाख, ७ हजार हिंदू मुले जन्माला आली, तर केरळमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २७ टक्के असूनही याच काळात २ लाख, ११ हजार मुस्लीम मुले जन्माला आली. २०१७ मध्ये २ लाख, १० हजार, ७१ हिंदू मुले जन्मली, तर मुस्लीम मुलांची संख्या २ लाख, १६ हजार, ५२५ मुस्लीम मुले जन्माला आली. हेच चित्र २०२१ पर्यंत होते. हिंदूंपेक्षा अर्धी लोकसंख्या असलेल्या मुस्लीम समाजाच्या मुलांचा जन्मदर दुप्पट होता. म्हणजे जवळजवळ ४६ टक्के होता. याचाच अर्थ भविष्यात केरळचे काय चित्र असणार आहे, हे स्पष्ट आहे.
केरळमध्ये कट्टरपंथी जिहाद्यांच्या आतंकवादी संघटना फोफावल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’सोबत ‘व्होट जिहाद’ हे या संघटनांचे काम. त्यांच्या मते, हिंदू काफिर आहेत. त्यामुळे त्यांना संपवायलाच हवे! या हिंदूद्वेष्ट्या संघटनांचे हस्तकही केरळच्या कम्युनिस्ट सरकारला हिंदूविरोधी भूमिका घेण्यासाठी दबाव टाकत असतात. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कट्टर हिंदूविरोधी आहेत. त्यांचे जावई पी. ए. मोहम्मद रियास देखील कट्टर हिंदूविरोधी आहेत. गोमांस उत्सव साजरा करत रियासने त्याची राजकीय कारकीर्द सुरू केली होती. केरळच्या कम्युनिस्ट राजकारणात रियासचा बोलबाला आहे. त्यामुळे हिंदू, रा. स्व. संघ यांच्याशी संदर्भित प्रत्येक गोष्टीला केरळचे कम्युनिस्ट सरकार त्याला विरोध करते.
केरळ सरकार जर असे समजत असेल की अशी मुस्कटदाबी करून आपण हिंदूंना नामोहरम करू शकू तर हा त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे. त्यामुळे कम्युनिस्ट सरकारने भलत्याच भ्रमात राहू नये. धाकाने, जबरदस्तीने किंवा सूडबुद्धीने या कारवाया करणे आता बंद करावे.







