28.7 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरधर्म संस्कृतीकेदारनाथ दर्शन; सारा अली खानला द्यावे लागेल 'सनातनी' प्रमाणपत्र

केदारनाथ दर्शन; सारा अली खानला द्यावे लागेल ‘सनातनी’ प्रमाणपत्र

केदारनाथ बद्रीनाथ मंदिर समितीचे नवे नियम

Google News Follow

चित्रपट अभिनेत्री आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान ही नियमित केदारनाथ दर्शनासाठी जाते पण आता ते सोपे राहिलेले नाही.

यापुढे केदारनाथ मंदिर आणि बद्रीनाथ मंदिर येथे पूजा सुरू ठेवण्यासाठी तिला शपथपत्र सादर करावे लागू शकते. बद्री-केदार मंदिर समितीने यासंदर्भात नवा नियम जाहीर केला आहे.

समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हिंदू नसलेल्या भाविकांना आता दर्शनासाठी हिंदू धर्मावर श्रद्धा असल्याचे लेखी शपथपत्र द्यावे लागेल.

त्यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक सनातन धर्मावर विश्वास ठेवतात आणि ‘मी सनातनी आहे, मला हिंदुत्वावर विश्वास आहे’ असे लेखी घोषणापत्र देतात, त्यांचे स्वागत आहे.”

हे ही वाचा:

इराणच्या सुरक्षा धोरणाचे प्रमुख अली लारिजानीसह मुलगा, अंगरक्षक ठार

कलिना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थीचा संशयास्पद मृत्यू

डेटिंग ॲप ‘हनीट्रॅप’चा पर्दाफाश

उन्हाळ्यात टॅनिंगची चिंता नाही! घरच्या घरी तयार करा ‘हे’ नैसर्गिक उटणे

काय आहे नवीन नियम?

गैर-हिंदू भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी शपथपत्र सादर करणे बंधनकारक

त्या शपथपत्रात हिंदू धर्मावरील श्रद्धेची स्पष्ट नोंद असणे आवश्यक

नियम सर्व गैर-हिंदूंना समानपणे लागू


सारा अली खानबाबत समितीचे मत

सारा अली खान ही केदारनाथ मंदिराला वारंवार भेट देत असते. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंगपासून तिचे या तीर्थक्षेत्राशी खास नाते निर्माण झाले आहे.

समितीने स्पष्ट केले की, जर सारा अली खानने सनातन धर्मावर श्रद्धा असल्याचे शपथपत्र दिले, तर तिला मंदिरात पूजा करण्याची परवानगी दिली जाईल.

वाद आणि चर्चा

या निर्णयामुळे धार्मिक स्थळांवरील प्रवेश आणि आचारसंहितेबाबत नवीन वाद निर्माण झाला आहे.
काही जणांच्या मते हा नियम परंपरा जपण्यासाठी आवश्यक आहे, तर काहींना तो धार्मिक स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारा वाटतो.

मंदिर समिती मात्र सांगते की, हा निर्णय परंपरा आणि धार्मिक भावना जपण्यासाठी घेतला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा