24 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरसंपादकीयआदित्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…

आदित्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…

हिंदुत्वविरोधकांवर अलिकडे आदित्य यांचे प्रेम प्रचंड ऊतू जातेय.

Google News Follow

Related

मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये इंडी आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आगमन झाले तेव्हा शिउबाठाचे नेते, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राहुल यांना मिठी मारली होती. इंडी आघाडीची पुढील बैठक तामिळनाडूमध्ये आहे, तेव्हा ते उदयनिधी स्टॅलिन यांनाही तशीच घट्ट मिठी मारतील अशी शक्यता आहे. कारण हिंदुत्वविरोधकांवर अलिकडे आदित्य यांचे प्रेम प्रचंड ऊतू जातेय.

 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत गरळ ओकली आहे. तामिळनाडूमध्ये द्रविड राजकारणाच्या नावाखाली जे काही हिंदूविरोधाचे राजकारण सुरू असते त्याचीच एक झलक उदयनिधी याच्या वक्तव्यातून दिसलेली आहे. ‘आपण डेंग्यू, मलेरीया आणि कोरोनाचा विरोध करू शकत नाही, त्याला संपवावे लागते. तसेच सतानत धर्मालाही संपवावे लागेल’, असे उदयनिधी याचे विधान आहे.

 

 

एखाद्या मोठ्या कर्तृत्ववान नेत्याची मुलं आणि नातवंड अगदीच सुमार दर्जाची निपजतात. त्यांच्याकडे केवळ अहगंडाशिवाय दुसरे काहीही नसते. ना बुद्धीमत्ता, ना कर्त्तृत्व. उदयनिधी याची परिस्थिती वेगळी नाही. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाच्या ताणामुळे सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचे निधन झाले’, असे बावळट विधान त्याने केले होते.

 

 

तामिळनाडूमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष के.अण्णामलई यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा पसारा वाढू लागला आहे. हा तरुण झपाटल्यासारखे काम करतोय. हिंदुत्वाची सुप्त लाट तामिळनाडूत जाणवू लागली आहे. अण्णामलाई यांनी उदयनिधी याच्या आचरटपणाला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘उदयनिधी यांचे विधान ही मिशनऱ्यांची उसनवारी आहे’.

 

 

इंडी आघाडीच्या बैठकीनंतर उदयनिधी यांनी हे विधान केले. हे विधानमध्ये तामिळनाडूमधील द्रमुकच्या ऱ्हासाची नांदी आहे. कालपर्यंत हिंदू धर्माच्या प्रतीकांचा अपमान करणारे डावे अलिकडे डोक्यावर मंगलकलश घेऊन आणि कपाळाला गंध टिळे लावून हिंदू सणवारांमध्ये वावरत असतात हे बहुधा उदयनिधी यांना माहिती नाही. जसे ते राहुल गांधी यांना माहिती नाही.

हे ही वाचा:

गणेशोत्सवासाठी रेल्वेने पोहोचा फक्त ५० रुपयांत

खिचडी घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

राज ठाकरेंना विसर पडला,पवारांनाच मराठा आरक्षण नको होते…

शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार

 

राहुल यांनी हिंदुत्वाचे शिखर मानले जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान केला. तरीही शिउबाठाने त्यांचे जोडे डोक्यावर मिरवले. इंडी आघाडीच्या बैठकीत आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांना कडकडून मिठी मारतायत, अशी छायाचित्र व्हायरल झाली होती. सावरकरांचा अपमान करणारे शिउबाठाच्या नेत्यांचे मालक झाले आहेत. ठाकरे त्यांच्या तैनाती फौजेचा हिस्सा झाले आहेत. स्वातंत्र्यवीरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा शिउबाठाच्या नेत्यांनी राहुल यांना दिला होता. प्रत्यक्षात आदित्य ठाकरे त्यांच्या भारत जोडो यात्रेत मिरवले होते. आता हयात मध्ये त्यांची गळाभेटही घेतली.

 

 

अवघी इंडी आघाडी अशा हिंदूविरोधी नेत्यांनी भरलेली आहे. प.बंगालमध्ये मौलवींना तनखा देणाऱ्या ममता. बिहार-उत्तर प्रदेशात मुस्लीम-यादव समीकरण जुळवून सत्तेवर येऊ पाहणारे यादव नेते, अरविंद केजरीवाल, तामिळनाडूचे स्टॅलिन सगळे एका माळेचे मणी. असे लोक जेव्हा हिंदुत्वाचा अपमान करायचे तेव्हा महाराष्ट्रातून एक वाघ डरकाळी फोडायचा. तो वाघ आता उरला नाही. त्यांचे नाव घेणारे हिंदुत्वविरोध्यांच्या गळ्यात गळे घालतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा