29 C
Mumbai
Friday, February 6, 2026
घरसंपादकीयतख्तापालट नको गं बाई... तुलसी गबार्डवर विश्वास ठेवता येईल का?

तख्तापालट नको गं बाई… तुलसी गबार्डवर विश्वास ठेवता येईल का?

Google News Follow

Related

अमेरिका जगभरात सत्ता उलथवण्याचे प्रयोग करत असते. अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स तुलसी गबार्ड यांनी बहरीन येथे बोलताना या विषयावर भाष्य केले. सत्ताबदलाच्या कसरती करून अमेरिकेने कसा ट्रिलियन डॉलरचा चुराडा केला याची कथा सांगत, उसासे टाकले. गबार्ड या हिंदू आहेत. भारताबाबत त्यांनी अनेकदा आत्मीयता व्यक्त केलेली आहे. तरीही त्यांच्या या विधानावर विश्वास ठेवता येईल का? या पुढे भारतात सत्ता परिवर्तन करण्यासाठी सुपारी देण्याचे धंदे अमेरिका बंद करेल का ? काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उचापती पाहिल्या तर असे वाटत नाही.

बहरीनमध्ये तुलसी गबार्ड काय बोलल्या हे आधी पाहुया. अनेक दशके अमेरिकेचे परराष्ट्र धोरण सरकारे पाडणे, उलथवणे, दुसऱ्या देशांवर अमेरिकी व्यवस्था लादण्याचा प्रयत्न करणे, दुसऱ्यांच्या संघर्षात हस्तक्षेप कऱणे, अशा अंतहीन जाळ्यात अडकले होते. यातून आम्ही मित्रांपेक्षा जास्त शत्रू निर्माण केले. यातून ट्रिलियन डॉलरचा चुराडा झाला, कित्येकांचे बळी गेले, अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. हे सगळे बोलल्यानंतर गबार्ड यांनी ट्रम्प यांना मात्र क्लीनचिट दिली. त्यांचे धोरण प्रगतीशील आहे. डील ड्रीव्हन आहे, अशी पुस्ती जोडली. गबार्ड या ट्रम्प सरकारच्या एका महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाला निश्चितपणे अर्थ आहे. त्यांच्या विधानानंतर भारतात यापुढे अमेरिकेकडून सत्तापरिवर्तनाचे प्रयोग बंद होतील का? काँग्रेस पक्षाला जॉर्ज सोरोस याच्या सारख्या सीआयएच्या कळसूत्री बाहुल्याकडून रसद मिळणे बंद होईल का? सोरोस आणि ट्रम्प यांचा मोठा पंगा असल्यामुळे कदाचित सोरोस यांचा वापर होणार नाही, परंतु सोरोस हे काही सीआयएच्या हातातील एकमेव मोहरा नाही. असे बरेच आहेत.

अमेरिकेने आजवर जिथे जिथे सत्तापालटाचे खेळ केले, त्याचे कारण एकच होते. त्या देशाचा नेता अमेरिकेच्या हातचे बाहुले बनायला तयार नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत परिस्थिती वेगळी नाही. मोदी अमेरिकेच्या मनासारखा व्यापार करार करत नाहीत. भारताने आखलेल्या लक्ष्मण रेषा अमेरिकेला ओलांडू देत नाहीत, म्हणून ट्रम्प यांनी बऱ्याच लटपटी करून पाहील्या. मी भल्या मोठ्या ट्रेड डिलची ऑफर देऊन भारत पाकिस्तानात युद्धबंदी घडवून आणली, या युद्धात सात नवी कोरी विमाने पाडण्यात आली. असे संदिग्ध वक्तव्य करून त्यांनी राहुल गांधी यांच्या हाती कोलीत देण्याचे प्रयत्न केले. थोडक्यात देशांतर्गत राजकारणात मोदी यांची फजिती व्हावी, त्यांनी नाक मुठीत घेऊन लोटांगण घालावे, ही अपेक्षा त्यामागे होती. त्यानंतर इंडीया इज डेड इकोनॉमी हे विधान केले. भारताचे आर्थिक यश काळवंडण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांच्या विधानाचा राहुल गांधी यांनी केलेला वापर हा योगायोग होता, की साटेलोटे हे उघड झालेले नाही. परंतु, यात काही तरी सूत्र निश्चितपणे असणार.

राहुल गांधी यांनी बिहार निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा प्रय़त्न केला. त्यांच्या अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्बमुळे सरकारच्या चिरेबंदीचा साधा कपचा उडताना दिसत नाही. हरीयाणा विधानसभेत घपला झाला, असा दावा करताना ज्या ब्राझिलियन मॉडेलच्या नावाने राहुल गांधी हंगामा करत होते. ते ओळखपत्र एका पिंकी नावाच्या महिलेचे असून तिने वोटींग कार्डावरचा फोटो चुकीचा असल्यामुळे आपण तक्रार केली होती. आपले वोटींग कार्ड परत केले होते. आणि मतदानाची जी स्लीप निवडणुकीच्या आधी घरी येते तिच्या आधारावर मतदान केले होते, असा खुलासा केलेला आहे.
हरीयाणातील गुडराना गावातील भाजपा जिल्हा परिषद उपाध्यक्ष उमेश गुडरानाच्या घर क्रमांक १५० मध्ये ६६ मतदार आहेत. घर क्रमांक २६५ मध्ये ५०० मतदार आहेत. इंडीयन एक्सप्रेसच्या पत्रकारांनी इथे दौरा केला. बाब उघड झाली की गुडराना यांच्या चार पिढ्या या अनेक घरे असलेल्या एकाच पत्त्यावर राहतात. ८० वर्षापूर्वी या घराचा जो क्रमांक होता तो बदलण्यात आलेला नाही. परिवार वाढला तसा चारही पिढ्यांची घरे याच क्रमांकाने मतदार यादीत नोंदवण्यात आली.
घर क्रमांक २६५ हे घर नसून एक मोठा प्लॉट आहे. तिथे २०० परिवार राहतात. वरवरची माहिती घेऊन राहुल गांधी वाट्टेल ते आरोप करतात. आपल्या देशातील मतदारांचा अपमान करतायत. काँग्रेसच्या काळात एक विदेशी महिला विवाह करून भारतात आली. इथले नागरिकत्व न स्वीकारता या देशाची मतदार झाली. हा या देशातील सगळ्यात मोठा मतदार यादीतील घोटाळा होता. त्यावर राहुल गांधी कधी बोलणार?

७ ऑगस्ट रोजी दिल्लीत राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परीषदेत झळकवलेल्या पीडीएफची प्रत म्यानमारमध्ये तयार कऱण्यात आली होती, असा आरोप भाजपाने पुराव्यानिशी केला. राहुल गांधींचे टूलकिट म्यानमारमधून आयात केल्याचा दावा केला.आता त्यांची हरीयाणाची टूलकिट कुठून आली याचा तपास व्हायला हवा.

हे ही वाचा..

राजद आणि काँग्रेस एकमेकाला खाली खेचण्यात व्यस्त

बनावट बॉम्ब धमकी ईमेल प्रकरणात पोलिसांना यश

सोलर फोटोव्होल्टाइक मॉड्यूल उत्पादन क्षमता वाढणार

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुकिंग सुरु

मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर त्यात दुरुस्ती सुचवण्यासाठी मतदारांना महिन्याभराचा अवधी दिला जातो. ही सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध असते. निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय पक्षांकडे या याद्या जातात. मतदानाच्या वेळी मतदार केंद्राच्या प्रत्येक बुथवर सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात. ते संशयास्पद मतदारावर आक्षेप घेऊ शकतात. निवडणूक आयोगाचे बूथ लेव्हल ऑफिसर असतात. त्यांची मदत घेऊन कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हजार मतदार असलेल्या बूथमध्ये असलेला बोगस मतदार सहज शोधू शकतो. परंतु राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक बहुधा निवडणुकीच्या आधी झोपा काढत असतात. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही तुम्हाला निकालात काही काळेबेरे वाटले तर पुढच्या ४५ दिवसात कोणताही उमेदवार उच्च न्यायालयात निकालाला आव्हान देऊ शकतो. सुरक्षेचे इतके पदर असताना गडबड होण्याची शक्यता जवळजवळ नाही. लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी संविधानकर्त्यांनी ही सगळी काळजी घेतलेली आहे. परंतु राहुल गांधींचा त्यावर विश्वास नाही. ते वारंवार जेन झीच्या नावाने टाहो फोडताना दिसतायत. त्यांचे आरोप खोटे आहेत, हे पुराव्यासह सिद्ध झालेले आहेत. त्यांना परदेशातून रसद येते हेही सिद्ध झालेले आहे. या आधी सोरोसच्या वृत्तसंस्था ऑर्गनाईज्ड क्राईम एण्ड करप्शन रिपोर्टीग प्रोजेक्टमध्ये मोदी सरकारच्या विरोधात काही तरी प्रसिद्ध व्हायचे आणि राहुल गांधी त्याचा वापर करून देशात हंगामा निर्माण करायचे.

लोकसभा निवडणुकी आधी ते अमेरिकेत जाऊन आले होते. व्हाईट हाऊसमध्ये त्यांची अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाचे प्रमुख असिस्टंट सेक्रेटरी डोनाल्ड लू यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यामुळे अमेरिकी सरकार आणि राहुल गांधी यांचे गुळपीठ होते ही बाब उघड आहे. ट्रम्प आल्यानंतर सीआयएच्या या उघड कारवाया बंद झाल्या असतील तरी त्या पूर्ण बंद झाल्याची शक्यता कमी आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी यांचा गेम करण्याचा प्रयत्न केला. सध्या व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मदुराओ यांच्या नजरेत खुपतायत. त्यांना हटवण्यासाठी ते ताकद लावताना दिसतायत. त्यामुळे भारतात तसे काही करण्याचा त्यांचा प्रयत्न बंद झाला असेल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तुलसी गबार्ड या भारतावर आस्था असलेल्या नेत्या आहेत. परंतु आहेत त्या ट्रम्प सरकारचा भाग. राहुल गांधी यांच्यात फक्त शारीरीक क्षमता आहे. त्यांचा बौद्धिक पल्ला मर्यादीत आहे, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. तरीही ते नेते आहेत आणि त्यांना समर्थकही आहेत. हे समर्थक फुटक निर्माण होत नाहीत. त्याच्यासाठी पैसा ओतावा लागतो. तुलसी गबार्ड यांनी तेच अधोरेखित केले आहे. सत्तापालटाच्या खेळात अमेरिकेने ट्रिलियन डॉलरचा चुराडा केलेला आहे. आता ज्या अमेरिकेवर ३८ ट्रिलियनचे कर्ज झाले आहे, त्यांना हे शौक परवडणारे नाहीत. सीआयएच्या भारतविरोधी कारवाया बंद झाल्या असतील तर त्याचे हे एकमेव कारण आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा