26 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरसंपादकीयया दोन घटनांमध्ये समानसूत्र आहे का?

या दोन घटनांमध्ये समानसूत्र आहे का?

हा सगळा मामला म्हणजे देशाच्या विरोधात रचण्यात येत असलेले एक कारस्थान

Google News Follow

Related

देशात धर्मांतराचे रॅकेट चालवणाऱ्या छांगूरबाबा बाबत बराच तपशील बाहेर आलेला आहे. हे प्रकरण भारतातील धर्मांतराशी संबंधित असले तरी याला निश्चितपणे आंतरराष्ट्रीय कंगोरे आहेत. फक्त आखाती देशच नाहीत, पाकिस्तान आणि नेपाळचे सुद्धा जबरदस्त कनेक्शन आहे. एका बाजूला या छांगूरच्या रॅकेटबाबत बरीच महिती समोर येत असताना आणखी एक मोठा गौप्यस्फोट नेपाळमधून करण्यात आला आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना भारतावर हल्ला करण्यासाठी नेपाळच्या भूभागाचा वापर करतील असा इशारा नेपाळी सरकारने दिला होता. छांगूरबाबा आणि त्याच्या कारवायांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का?

छांगूरने धर्मांतराचे केंद्र उत्तर प्रदेशात बनवले असले तरी त्याची सुरूवात मुंबईच्या हाजीअली दर्ग्यातून झाली हे विसरता येत नाही. त्याचे महाराष्ट्र कनेक्शनही आता उघड झाले आहे. मुंबई-पुण्यात त्याच्या मालमत्ता आहेत. त्याच्या रॅकेटसाठी काम करणारी माणसे आहेत. इडी केलेल्या छापेमारी पैकी दोन ठिकाणे मुंबईतील आहेत. माहिम आणि वांद्रे. महाराष्ट्रात सुद्धा त्याने दिवे लावले असणार हे निश्चित. त्या माहितीची प्रतीक्षा आहे.

उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये बसून धर्मांतराचे रॅकेट चालवणाऱ्या छांगूरचे नेपाळ कनेक्शन तगडे आहे. सुमारे ४० देशांतून त्याच्याकडे आलेल्या ५०० कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपये नेपाळमधून भारतात वळवण्यात आले. त्यासाठी त्याने नेपाळमधील १०० बँक खात्यांचा वापर केला. छांगूरच्या टोळीतील चार सदस्यांनी नेपाळमध्ये चार पासपोर्ट बनवले. परदेश दौऱ्यासाठी याच पासपोर्टचा वापर केला जायचा. हे एकट्यादुकट्या माणसाचे काम नाही. एक मोठी टोळी इथे कार्यरत असणार.

भारत नेपाळच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यासाठी तो प्रयत्नशील होता. काठमांडू, नवलपरासी, रुपनदेही, बांके, दांग या भागात त्याने भेटी दिल्या होत्या. धर्मांतरासाठी इथे ४६ केंद्र सुरू करण्याचे त्याचे प्रयत्न होते.

हा जो तपशील लक्षात घेतला की, आपल्याला लक्षात येत नेपाळ हेही छांगूरच्या कारवायांचे केंद्र होते. जर नेपाळमधील शंभर बँक खात्यातून तो भारतात ३०० कोटी वळते करतो, तर तिथे खाती उघडण्यासाठी त्याच्याकडे शंभर माणसे आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्या रॅकेटातील चार भारतीयांचे तो नेपाळमध्ये पासपोर्ट बनवतो तर सरकारमध्ये सुद्धा त्याची माणसं आहेत. नेपाळच्या सीमेवर जर तो धर्मांतरासाठी ४६ केंद्र सुरू करण्याची तयारी करतो तर त्याच्याकडे ही केंद्र चालवण्यासाठी किमान १५० ते २०० लोकांची फौज आहे, असे मानायला हरकत नाही.

माणसे पेरणे हे छांगूरबाबाच्या कुवतीच्या पलिकडले आहे. माणसांचे जाळे बनवणारी माणसे वेगळी असतात. त्यामुळे तो दाऊद इब्राहीम आणि आयएसआयचे जाळे वापरत असावा, त्यांच्यासोबत काम करत असावा असे मानायला वाव आहे. छांगूर नेपाळमध्ये जाऊन आयएसआयच्या लोकांसोबत गाठीभेटी करीत असल्याची शक्यता आहे.

नेपाळने भारताला मोठा इशारा दिला होता. नेपाळच्या सीमेचा वापर करून भारतावर मोठा हल्ला होऊ शकतो, असा हा इशारा होता. लष्कर ए तोयबा किंवा जैश ए मोहम्मद या संघटना हा हल्ला घडवू शकतात. ही बातमी भारतासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे छांगूरच्या धर्मांतर जाळ्याचा आणि या बातमीचा काही संबंध आहे का हे तपासणे गरजेचे आहे.

छांगूरच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये जे काही सुरू आहे ते नवे नाही. २०२१ मध्ये एटीएसने उमर गौतम नावाच्या एका मौलानाला अटक केली होती. हा धर्मांतरीत हिंदू होता. तोही अशा प्रकारचे धर्मांतराचे मोठे रॅकेट चालवायचा. त्यानेही हजार पेक्षा जास्त लोकांचे धर्मांतर केले होते. एटीएसने त्याला २०२१ मध्ये अटक केली. त्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. देशात शरीया लागू करण्यासाठी उमर गौतम राबत होता.

उमरला अटक झाल्यानंतरही धर्मांतर बंद झाले नाही. छांगूरला २०२५ मध्ये अटक करण्यात आली, याचा अर्थ त्याच्या कारवाया आधी काही वर्षे सुरू होत्या. म्हणजे २०२१ मध्ये उमर गौतम याचा तंबू एटीएसने उखाडल्यानंतर छांगूर कामाला लागला असणार. याला अटक केल्यावर तिसरा मैदानात येईल. याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे यांचा रिंगमास्टर वेगळा आहे. तो त्याच्या सोयीने उमर गौतमला वापरतो, तो बाद झाला की छांगूरला वापरतो.

रिंगमास्टरचे काम या मोहऱ्यांना पैसा पुरवणे. माणसे पुरवणे. भारतात भारताबाहेर त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देणे. उद्या पाकिस्तानला जर भारतविरोधी घातपात करण्यासाठी नेपाळमध्ये तळ मजबूत करायचा असेल तर त्याला मोठ्या संख्येने कट्टरवाद्यांची गरज आहे. ही कुमक धर्मांतराच्या माध्यमातून मिळू शकते. छांगूरने भारत-नेपाळ सीमेवरील गावांना धर्मांतरासाठी निवडले याचाही काही अर्थ असणार. जर भारतात घातपात घडवण्यासाठी नेपाळमधून दहशतवादी सीमेवरून घुसवण्यात येणार असतील तर तिथे त्यांना मदत करणाऱ्या लोकांचे तांडे हवेत ही रणनीती यामागे आहे.

हे ही वाचा:

फर्टिलायझर टास्क फोर्सची मोठी कारवाई

राहुल गांधींचं मौन म्हणजे पाकिस्तानप्रेम

काँग्रेस विघटनवादी राजकारणात गुंतलेला

नोएडा देशातील सर्वात स्वच्छ शहर!

हे जे सगळे चालले आहे, त्यामागे दूरगामी रणनीती आहे. ही रणनीती दहशतवादाच्या पेक्षा प्रभावी ठरणार आहे. एका दहशतवादी हल्लात काही लोक ठार होतात. जनमानसाला हादरा बसतो, परंतु धर्मांतराचे चटके पुढच्या कैक पिढ्यांना बसणारे असतात. उत्तर प्रदेश हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे राज्य आहे. देशाच्या राजकारणाच्या चाव्या कोणाकडे असणार हे ठरवणारे राज्य. इथे असलेली भाजपाची सत्ता हलवायची असेल तर इथले जनसंख्येचे गणित बदलण्याची गरज आहे. ते दहा वर्षांनी बदलले, २० वर्षांनी बदलले तर त्यासाठी थांबण्याची यांची तयारी आहे. महिलांना त्यासाठी टार्गेट केले जात आहे. लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये त्यांना ओढण्यात येत आहे. कारण एका महिलेचे धर्मांतर झाले की फक्त एक व्यक्ति धर्मांतरीत होत नाही, एक पिढी धर्मांतरीत होते. जे तरुण या हिंदू तरुणींना जाळ्यात ओढतात ते सगळे स्लीपर सेल इतकेच खतरनाक आहेत. यांच्या ज्या पिढ्या निर्माण होतील त्या देशाचे काय भले करतील हे सांगण्याची गरज नाही.

योगी आदित्यनाथ यांच्यासारखा कडवा हिंदुत्ववादी नेता ज्या उत्तर प्रदेशात सत्तेवर आहे, तिथे ही स्थिती. म्हणजे बाकी ठिकाणी किती अंधार असेल कल्पना करा. मिशनरी आणि मौलवी इथे हातात हात घालून काम करतायत. गोरगरीब हिंदूंना, दिव्यांग हिंदूंना टार्गेट करून त्यांचे धर्मांतर करण्यात येत आहे. हा सगळा मामला म्हणजे देशाच्या विरोधात रचण्यात येत असलेले एक कारस्थान आहे. छांगूरची मालमत्ता जप्त करून किंवा त्याचे टोळके उद्ध्वस्त करून ही समस्या संपणार नाही. एक उमर गौतम गेला, त्याची जागा छांगूरने घेतली. छांगूर गेला तर आणखी कोणी येईल. कारण आखातातून धर्मांतरासाठी येणारा पैसा काही थांबणार नाही, पाकिस्तानकडून मिळणारी कुमक बंद होणार नाही. या प्रश्न दूरगामी परीणाम घडवणारा आहे, त्याचे उत्तर शोधताना त्याच पद्धतीने शोधण्याची गरज आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा