30 C
Mumbai
Thursday, January 15, 2026
घरसंपादकीयलष्कर ए तोयबाच्या तोफा पाकिस्तान विरुद्ध वळतायत का भारताचे धुरंधर नव्या मिशनवर...

लष्कर ए तोयबाच्या तोफा पाकिस्तान विरुद्ध वळतायत का भारताचे धुरंधर नव्या मिशनवर ?

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये जनतेला काडीचीही किंमत नाही. पाकिस्तान म्हणजे तिथले लष्कर आणि राज्यकर्ते. ते जनतेला मोजत नाही. अन्यथा देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेता तुरुंगात नसता. तिथल्या दहशतवादी संघटना लष्कराच्या अर्ध्या आज्ञेत असतात. लष्कर ए तोयबाचा यात वरचा क्रमांक आहे. परंतु हे चित्र बदलत असल्याचे संकेत आहे. फिल्ड मार्शल आणि पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स फोर्स आसिम मुनीर यांच्या विरोधात लष्कर ए तोयबाचे सूर उमटू लागले आहेत. तोयबाच्या तोफांचे तोंड कायम भारताच्या दिशेला असते. परंतु ही दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लष्कर ए तोयबा आणि मुनीर यांच्यात खटके उडू लागले आहेत. ही करणी सुद्धा भारताच्या धुरंधरांची असावी असे मानायला वाव आहे.

पाकिस्तानात कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांची ताकद फौजांएवढी नसेल परंतु कमीही नाही. पाकिस्तानी जनतेत त्यांचा एक मोठा समर्थक वर्ग आहे, जो त्यांना रसद पुरवतो. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहमद या दोन दहशतवादी संघटनांचा पाकिस्तानमध्ये मोठा जोर आहे. भारत विरोधी कारवायांसाठी या संघटना ओळखल्या जातात.

गेल्या काही वर्षात पाकिस्तानच्या बलोचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतात सक्रीय असलेले बंडखोर गट पाकिस्तानी लष्कराला टार्गेट करताना दिसतायत. त्यांना रोखण्यात पाकिस्तानी फौजा अपयशी ठरत आहेत. खैबर पख्तुनख्न्वामध्ये तहरीक ए तालिबान पाकिस्तान आणि बलोचिस्तानमध्ये बलोच लिबरेशन आर्मी, या संघटनेचा आत्मघाती गट माजिद ब्रिगेड यांच्या हल्ल्यात शेकडो पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. अनेक भागात यांची हुकूमत चालते. इथे पाक फौजा फिरकतही नाहीत. त्यांच्यासाठी हे भाग नो गो झोन बनलेले आहेत. पाकिस्तानी फौजा यांच्यासमोर पाठ दाखवून पळतायत, असे चित्र वारंवार दिसते आहे.

हे ही वाचा:

मकर संक्रांतीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत ५ पवित्र स्नान पर्व

I-PAC बाबतची तृणमूलची याचिका कोर्टाने फेटाळली

१६ हजारांहून अधिक उमेदवारांचे भविष्य आज होणार मतपेटीत बंद

हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच कळलं – ही गंभीर दुखापत आहे…

दुसऱ्या बाजूला अज्ञातांचा धुमाकूळ सुरू आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद या संघटनांचे दहशतवादी जे भारतविरोधी दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होते. आयएसआय आणि पाकिस्तानी फौजांचे अधिकारी जे भारत विरोधी कारवायांचे म्होरके होते. अशा किमान दोन डझन लोकांना जन्नतमध्ये पाठवण्याचे काम या अज्ञातांनी केले आहे. हे कमी की काय म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून दुष्काळात तेरावा केला. जैश ए मोहमद आणि लष्करच्या दहशतवादी तळांना लक्ष केले. कित्येकांना ठार केले. ७२ हुरांच्या भेटीला गेलेल्यांचा खरा आकडा बाहेर येणे कठिणच आहे.

पाकिस्तानमध्ये झालेल्या एका उच्चभ्रु खानदानाच्या निकाह सोहळ्यात मोठा स्फोट झाला. यात वधू-वरांसह अनेक जण थेट जन्नतमध्ये रवाना झाले. वर मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या डेव्हीड हेडलीचा जवळचा नातेवाईक होता. वधू आयएआय अधिकाऱ्याची मुलगी होती. हा अधिकारी जैश ए मोहमद या संघटनेच्या संपर्कात होता. या घटनेची अधिकृतपणे पुष्ठी झालेली नाही. परंतु अशा घटना तिथल्या माध्यमांमध्ये येण्याची शक्यता शून्य असते.

भारतविरोधी कारवाया करायच्या आणि पुढे आयएसआयच्या सुरक्षा कवचात आयुष्य सुखाने घालवायचे हा काळ आता संपला. एकीकडे दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना ठोकले जात असताना दुसऱ्या बाजूला तोयबा आणि जैशच्या दहशतवाद्यांना एका वेगळ्या मोहीमेत जुंपण्याचा प्रय़त्न केला जात आहे.

तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचे खैबर पख्तुख्वामध्ये असलेले आव्हान आणि बीएलएचे बलोचिस्तानमध्ये असलेले संकट यामुळे चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरचे भवितव्य संपुष्टात आले आहे, चीनची ७० अब्जची गुंतवणूक पाण्यात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीनने पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. सीपेकचे काम पूर्ण करा आणि नंतर वाटगा घेऊन भीक मागायला या. चीनने पैसा फेकणे बंद केले तर पाकिस्तानी लष्कराची रोजी रोटी बंद पडायची या भीतीने मुनीर गारठला आहे. कारण पाकिस्तानचे नेते आणि लष्कर शहा भिक आणि कर्जावर गुजराण करतायत.

अमेरिकेकडून येणारा पैसा हा कामगिरीवर आधारीत असतो. तो अजून घाऊक प्रमाणात येत नसल्यामुळे चीनची रसद थांबली तर गोची होईल हे लक्षात घेऊन मुनीर यांनी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहमदच्या म्होरक्यांकडे शब्द टाकला आहे. टीटीपी आणि बीएलएच्या विरोधात या संघटनांनी मोर्चा खोलावा अशी मुनीर यांची अपेक्षा आहे.

इथूनच दहशतवादी संघटना आणि मुनीर यांच्यात पंगा सुरू झालेला आहे. पाकिस्तानातील प्रत्येक दहशतवादी संघटनेवर एकेका प्रांताचा आणि जमातीचा प्रभाव आहे. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्महवर पंजाब प्रांताचा आणि पंजाबी मुस्लीमांचा प्रभाव आहे. बीएलएवर बलोचांचा आणि टीटीपीवर पुश्तूंचा प्रभाव आहे. या संघटनांची उद्दीष्टेही वेगळी आहे. जैश आणि लष्कर या भारतविरोधी संघटना आहे. बीएलएला बलोचिस्तानचे स्वातंत्र्य हवे आहे. त्यांचा लढा पाकिस्तानी सत्तेच्या विरोधात आहे. टीटीपीला तालिबानांच्या विरोधात पाकिस्तानने जी दगाबाजी केली त्याचा वचपा काढायचा आहे. त्यामुळे पाकिस्तानी फौजांना ठोकण्याचा कार्यक्रम ते नियमितपणे करत असतात.

लष्कर ए तय्यबा म्हणजे मदीनाचे लष्कर. तय्यबा हे मदीना या शहराचे दुसरे नाव. जैश एक मोहमद म्हणजे महमदाची फौज. या दोन्ही संघटनांच्या दहशतवाद्यांचे ब्रेनवॉश अशा प्रकारे करण्यात आले आहे की ते इस्लामसाठी लढतायत, भारतात गझवा ए हिंद करण्याची मोहीम त्यांच्या खांद्यावर आहे. हिंदू आणि ज्यूंच्या विरोधात लढण्यासाठी त्यांच्या डोक्यात विष भिनवण्यात आले आहे. आता त्यांचे आयएसआयचे मालक त्यांचा वापर टीटीपी आणि बीएलएच्या विरोधात म्हणजे मुस्लीमांच्याच विरोधात करू इच्छितात. नेमकी यातूनच धुसफूस निर्माण झाली आहे. तोयबाच्या दहशतवाद्यांच्या लक्षात आले आहे की, आता आपला वापर धंदेवाईक मारेकऱ्यासारखा करण्याचा प्रय़त्न सुरू झालेला आहे. मुनीर हे करतोय कारण त्याला चीनी पैशाची रसद सुरू ठेवायची आहे. त्याला पाकिस्तानमधील चीनच्या गुंतवणुकीची काळजी घ्यायची आहे. त्याला पाकिस्तान आणि इस्लामपेक्षा पैसे फेकणाऱ्यांचे हित जपायचे आहे. यामुळेच पाक फौजांच्या विरोधात तोयबाचा एक गट धुमसू लागला आहे.

अलिकडेच सोशल मीडियावर अशफाक राणा या तोयबाच्या दहशतवाद्याचा व्हीडीयो व्हायरल झाला त्यात तो मुनीर याची चांगलीच झाडाझडती घेत आहे. अशफाक हा तोयबाचा मोठा कमांडर नाही. या वृत्ताची कोणी पुष्ठीही केलेली नाही. परंतु धूर येतो आहे याचा अर्थ कुठे तरी आग लागलेली आहे.
हाफीज सईद हा लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आहे. झकी उर रेहमान लखवी या तेवढाच शक्तीशाली असून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. मुंबईवर झालेल्या २६ /११ च्या हल्ल्यानंतर हाफीजवर पाकिस्तानी लष्करशहांनी बरेच निर्बंध आणले कारण. फानान्शिअल अक्शन टास्क फोर्सने दिलेला इशारा. वारंवार एफएटीएफकडून पाकिस्तानची रवानगी ग्रे लिस्टमध्ये होत असते. आधिक गाळात असलेला पाकिस्तानचे अर्थकारण अधिक खड्ड्यात जात असते. दुसऱ्या बाजूला ऑपरेशन सिंदुर आम्ही बंद केलेले नसून तात्पुरते पॉज केलेले आहे, असे सतत सांगण्यात येत आहे. आपले लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिलेला आहे. की नियंत्रण रेषे जवळ आजही सहा दहशतवादी तळ कार्यरत असून आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दोन तळ कार्यरत आहेत. आम्ही बारीक नजर ठेवून आहोत, असे त्यांनी ठणकावले आहे.

एका बाजूला भारताकडून दबाव, दुसऱ्या बाजूला एफएटीएफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा पाकिस्तानवर वाढत चाललेला दबाव, यामुळे तोयबा आणि जैशच्या कारवायांना चाप लावणे मुनीर याला भाग पडत आहे. त्यामुळे या दहशतवादी संघटनांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असताना आता त्यांचा बीएलए आणि टीटीपीच्या विरोधात वापर करण्याचा घाट घातला जातो आहे. इस्लामी गटांना आपसांत भिडवण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर अत्यंत उत्सुक आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा