31 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरसंपादकीयमोदींनी कसा रोखला भारतीय अर्थकारणाचा हलाला?

मोदींनी कसा रोखला भारतीय अर्थकारणाचा हलाला?

Google News Follow

Related

देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतात तयार करणे शक्य असलेल्या अनेक गोष्टी आपण आयात करत राहीलो. काही तर हृदया इतक्या महत्वाच्या होत्या. आर्थिक स्वातंत्र्य हे तुमच्या राष्ट्राचे हृदयच, परंतु ते विदेशी शक्तींकडे गहाण होते. कधीही दगाफटका होण्याची शक्यता होती. तो सुरूही झाला होता. एक भयंकर षडयंत्र सुरू होते, ज्याची झलक आदित्य धर यांच्या धुरंधर या सिनेमात पाहायला मिळते. देशाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशाच्या चलनी नोटा भारतातच छापल्या जातील, त्यासाठी शाई, सुरक्षा धागा सगळे काही भारतात निर्माण होईल असा प्रयत्न सुरू केला. भारतीय अर्थकारणाचा हलाला जो काँग्रेसच्या काळात सुरू होता, तो पूर्णपणे रोखला.

चलन तुमच्या अर्थकारणाचा कणा असते. त्याचे नियंत्रण दुसऱ्या देशाच्या हाती असणे म्हणजे युद्धाच्या काळात तुमच्या शस्त्रास्त्रांचे नियंत्रण त्यांच्याकडे असल्यासारखे आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून सत्तेची सूत्रे काँग्रेसकडे आहेत. जवाहरलाल नेहरु यांनी देशात आयआयएम आणि आयआयटी बनवले, याचे ढोल नेहमी पिटले जातात. टॅलेंटची अजिबात कमतरता असलेल्या या देशात चलनी नोटांचा कागद तयार करावा, शाई तयार करावी, सुरक्षा धागा तयार करावा असा प्रयत्न नेहरुंच्या काळात का झाला नाही? हा सवाल मात्र अनुत्तरीत आहे. कदाचित तेच कारण असावे ज्या कारणासाठी शस्त्र निर्मितीच्या क्षेत्रात देशाला परावलंबी ठेवण्यात आले. दलाली आणि भ्रष्टाचाराचे मार्ग खुले राहावे म्हणून ही आत्मनिर्भरता टाळण्यात आली.

२०१४ मध्ये मोदी सत्तेवर आले. त्या काळात देशात बनावट नोटांचा धंदा तेजीत होता. राजकारणी, सरकारी अधिकारी, पाकिस्तानी माफीया आणि आयएसआय असे जाळे तयार झाले होते. मासा तडफडावा तशी भारतीय अर्थव्यवस्था या जाळ्यात तडफडत होती. आधीच्या सरकारकडे ही सगळी माहिती आपल्या गुप्तचर यंत्रणांनी पुरवली होती. सरकारला फक्त ती फार गंभीर वाटत नव्हती. आदित्य धर यांच्या धुंरधर या सिनेमात पाकिस्तानात बनावट नोटांचा धंदा कसा राजरोस सुरू होता. जे लोक या धंद्यात सामील होते, तेच भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमध्ये कसे सामील होते, याचे सुंदर चित्रण दाखवले आहे.

आपले चलन ही पाकिस्तानची शक्ती बनले होते. डॉ.मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. फ्रॅजिल फाईव्ह या शब्दात जगभरात आपल्या अर्थकारणाची खिल्ली उडवली जायची. ही परिस्थिती कायम राहिली असती तर व्हेनेझुएलासोबत भारतही आज दिवाळखोर झाला असता. पोते भर पैसे मोजल्यानंतर पिशवीभर बटाटे विकत मिळाले असते. सत्तेवर येण्यापूर्वीपासून मोदींना हे चित्र दिसत होते. त्यांच्याकडे माहितीही होती. त्यामुळे सत्तेवर आल्या आल्या मोदींनी हे जाळे तोडण्याची सुरूवात केली. चलनी नोटांचा कागद, शाई आणि सुरक्षा धागा याबाबत भारत दुसऱ्या देशांवर अवलंबून होता हीच आपली दुखरी नस होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी ताकद लावली. टार्गेट ठरवले, रोड मॅप बनवला.

हे ही वाचा:

इंडी आघाडीची तामिळनाडूमधील हिंदू परंपरेच्या विरोधात एकजूट

भारतीय नागरिक होण्यापूर्वी मतदार बनल्याचा आरोप; सोनिया गांधींना नोटीस

‘इंडिगो’च्या गोंधळानंतर नव्या विमान कंपन्या सुरू करण्याचे सरकारकडून प्रयत्न

बनावट नोटांचा महाघोटाळ्यात कारवाई का झाली नाही?

नोटांच्या साखळीतील हे कच्चे दुवे पाकिस्तानने हेरले होते. किंवा भारतातील गद्दारांनी पाकिस्तानला ही माहिती पुरवली होती. आयएसआयने जावेद खनानी सारख्या तस्करांना या कामाला लावले. भारतातील गद्दार यात सामील झाले. त्यात अधिकारी होते, राजकीय नेते होते. सगळ्यांनी मिळून भारताच्या अर्थकारणावर घणाचे घाव घालायला सुरूवात केली. लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद असो वा पाकिस्तानातील लष्करशहा आणि नेते कायम काँग्रेसचे गोडवे गात असतात. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतरत भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारतील असा दावा करत असतात, त्याचे कारण हेच आहे. त्यांना भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांशी काही घेणे देणे नसते. हे संबंध साप मुंगूसासारखे आहेत, हे त्यांना ठाऊक असते. त्यांना फक्त दहशतवादी आणि भारतीय गद्दारांमध्ये असलेले अनैतिक आर्थिक हितसंबंध मजबूत करणे एवढेच त्यांचे लक्ष असते.

नोटांसाठी लागणारा कागद मध्य प्रदेशातील होशांगाबाद येथील सेक्युरीटी पेपर मिलमध्ये तयार व्हायचा. चलनी नोटांसाठी देशात कागदाची गरज सुमारे २२,००० टन असताना इथे फक्त ६००० टन कागदाची निर्मिती व्हायची. याचा अर्थ नोटांसाठी लागणारा कागद निर्माण करण्याचे तंत्र आपल्याकडे होते. फक्त त्याच्या निर्मितीची क्षमता वाढवण्याची गरज होती. सेक्युरीटी प्रिंटींग मिलची क्षमता वाढवण्याची आवश्यकता होती. काँग्रेसच्या सत्ताकाळात हे शक्य असूनही करण्यात आले नाही. मोदींनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर रिझर्व्ह बँकेला डेडलाईन दिली. त्या काळात भारतेच चलन भारतात बनलेल्या कागदावर भारतात निर्माण झालेल्या शाई आणि सुरक्षा धागा वापरूनच तयार झाले पाहीजे असे बजावले.

पुढे कार्यवाही किती झटपट झाली पाहा. ३० मे २०१५ रोजी होशांगाबाद येथील सेक्युरीटी पेपर मिलची क्षमता वाढवण्यात आली. ती ६ हजार टनांवरून १२ हजार टन करण्यात आली. म्हैसूरमध्ये आरबीआय़ची उपकंपनी असलेल्या बँक नोट पेपर  मिल इंडीया प्रा.लि. मध्ये १२ हजार टन कागद निर्माण होऊ लागला. आपले एकूण उत्पादन २४ हजार टन झाले. म्हणजे आपण गरजेपेक्षा जास्त कागदाची निर्मिती करू लागलो. मोदींनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यापासून फक्त एक वर्षात. त्यापूर्वी चलनांच्या कागदासाठी आपण ब्रिटीश कंपनी दे ला रू, जीसेके एण्ड डेव्हीएंट, लुईसेंथल या जर्मन कंपन्या, स्वीडनची क्रेन करन्सी, फ्रान्सची आर्जो विग्गीस या कंपन्यांकडून आपण पेपर खरेदी करत असू.

हीच परिस्थिती सुरक्षा शाईबाबत होती. एनआयसीपीए या स्विस कंपनीकडून आपण चलनी नोटांची शाई आयात करायचो. सुरक्षा धागा दे ला रू ही कंपनी पुरवायची. मोठ्या संख्येने बनावट चलन बाजारात आल्यामुळे मोदींनी २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर केली. बनावट नोटांच्या धंद्यावर मोठा घाव घातला. २०२२ पर्यंत आपण मैसूरमध्ये वर्णिका या युनिटमध्ये शाई उत्पादन युनिट सुरू केले. इथे आयआयटीचे टॅलेंट कामी आले. वर्णिकाची क्षमता १५०० मे.टनाची आहे. आपल्या गरजेसाठी ती पुरेशी आहे.

चलनी नोटांचा कागद असो वा शाई असो हे निर्माण कऱण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान थोड उच्च प्रतिचे असणार हे स्वाभाविक आहे. परंतु भारत हा असा देश आहे, ज्या देशातील मोठ्या संख्येने ड़ॉक्टर, इंजिनिअर, सॉफ्टवेअर तज्ज्ञ, संशोधन विदेशात गेले, तरीही भारतात टॅलेंटची कोणतीही कमतरता नाही. तरीही भारताच्या टॅलेंटचा वापर न करता विदेशातून आपण अशा गोष्टी आयात करत राहीलो, ज्याचा थेट संबंध देशाच्या आर्थिक सुरक्षेशी होता. म्हणजे आपली आर्थिक सुरक्षा विदेशी शक्तींच्या विवेकबुद्धीवर अवलंबून होती.

या सगळ्या गोष्टी निर्माण करण्यासाठी रॉकेट सायन्सची आवश्यकता नव्हती. असती तर ते ऱॉकेट सायन्सही आपण भारतात विकसित करून दाखवले आहे. काँग्रेसने या देशाच्या टॅलेंटला कमी लेखले. त्याच टॅलेंटचा वापर करून नरेंद्र मोदी यांनी भारताला चलनी नोटा, शाई आणि सुरक्षा धाग्याच्या प्रांतात आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत. सुरक्षा धागा तर अत्यंत महत्वाचा यामुळेच अस्सल नोटा आणि बनावट नोटांमध्ये फरक स्पष्ट दिसतो. होशांगाबाद आणि म्हैसूर येथील सेक्युरीटी मिलमध्ये आपण हा धागा तयार करीत आहोत.

हा सगळा घटनाक्रम नजरेखालून घातल्यानंतर प्रश्न हा निर्माण होतो, जे मोदींनी गेल्या दहा वर्षाच्या काळात करून दाखवले ते काँग्रेसने त्यांच्या सहा दशकांच्या सत्ता काळात का करून दाखवले नाही. नोटांचा कागद तर आपण १९६७ मध्ये होशांगाबाद मध्ये छापायला सुरूवात केली. म्हणजे इथे कागद निर्मितीच्या तंत्रासाठी आपण विदेशावर अवलंबून नव्हतो. ते आपल्याकडे होतेच. प्रश्न फक्त वाढत्या गरजेनुसार मिलची क्षमता वाढवण्याचा होता. ते करण्यासाठीही मोदी येईपर्यंत देशाला प्रतीक्षा का करावी लागली?

काँग्रेसच्या काळात अर्थकारणाचा हलाला सुरू होता. म्हणजे विदेशाचा टिळा लावून आलेले चलन तुम्ही पावन करून घ्यायचे, असा प्रकार अनेक दशके सुरू होता. ही सगळी विकसित राष्ट्रे अशी आहे, जी वसाहतवादाच्या मानसिकतेतून बाहेर आलेली नाही. भारताचा विकास ज्यांना सहन होत नाही. कायम भारताच्या प्रगतीमध्ये खोडा घालण्याचे काम हे देश करीत राहिले. त्या देशांकडे काँग्रेसने आपले आर्थिक स्वातंत्र्य गहाण टाकले होते. मोदींनी हे दुष्टचक्र मोडून काढले. धुरंधर सिनेमाच्या निमित्ताने रहेमान बलोचची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाची सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमाचा नायक नाही, खलनायक आहे. सिनेमाचा हिरो हमजा मजारी अर्थात रणवीर सिंह आहे. सिनेमाच्या पडद्यावरील हिरो कोणीही असो. या कथानकाचे खरे नायक नरेंद्र मोदी हेच आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा