नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून देशातील नक्षलवाद किंवा माओवाद यांचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले आणि त्या प्रयत्नांना यश येताना आपण पाहिलं. जवळपास नक्षलवादाने ग्रस्त असे जिल्हे होते, राज्य होती ती सगळी आता नक्षलवाद किवा माओवादापासून मुक्त झालेली पाहायला मिळतात. एक लक्ष्य निश्चित करण्यात आल की २०२६ मध्ये या हा नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करायचा आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न झाले. त्यात यश येताना आपल्याला पाहायला मिळालं. अशाच पद्धतीने नक्षलवादाप्रमाणेच दहशतवादही फोफावला. वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून हा दहशतवाद गेली अनेक वर्ष म्हणजे स्वातंत्र्यानंतर, पाकिस्तान निर्मिती झाल्यानंतर फोफावला. अनेक लोकांचे जीव या दहशतवादामुळे गेले. मग त्यात जवानांचे असतील सर्वसामान्य लोकांचे असतील पण हा दहशतवाद संपवण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न केले गेले पाहिजे होते तसे प्रयत्न आधीच्या सरकारांनी केले नाहीत, हे वास्तव आहे.
किंबहुना दहशतवाद फोफावतच राहिला. आपण पाहिलं की, नरेंद्र मोदी सरकार २०१४ मध्ये आलं, त्याच्या आधी काय स्थिती होती? अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत असत, कुठे बॉम्बस्पोट होईल, याची कोणालाही कल्पना नसे. कधी सायकल मध्ये ठेवलेला बॉम्ब तर कधी स्कूटरमध्ये ठेवलेला. कधी बस मध्ये तर कधी रेल्वेमध्ये. २००८ मध्ये तर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी भारतामध्ये आले ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. भारतात येऊन त्यांनी मुंबईमध्ये शेकडो लोकांना मारलं ते आपण विसरलेलो नाही अजून. त्यात कसाबसारखा अतिरेकी पकडला गेला त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी लक्षात तरी आल्या अन्यथा हा हिंदू दहशतवाद आहे असं दाखवण्याचा एक निर्लज्ज प्रयत्न करण्यात आळा. कदाचित कसाब सुद्धा त्याच्यामध्ये मेला असता तर हा हिंदू दहशतवाद होता अशा पद्धतीने एक नवी कहाणी किंवा एक नवीन कथानक रचण्यात आलं असतं. एवढंच नव्हे तर ते सिद्धही करण्यात आलं असतं. पण आपल्या सुदैवाने ते होऊ शकलं नाही आणि कसाव पकडला गेला.
अशा पद्धतीच्या घटना इतकी वर्ष होत असतानाही त्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सरकारने केला नाही. कदाचित तेव्हाच्या काळातली काँग्रेस सरकारही प्रामुख्याने मुस्लिम लांगुल चालनासाठी ओळखली जात होती त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीच्या दहशतवादाला थांबवण्यासाठी, थोपवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. पण आता नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीने दहशतवादाच्या संदर्भात झिरो टॉलरन्स ही भूमिका घेतलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन करायचा नाही, जिथे कुठे दहशतवाद दिसेल तिथे तो ठेचून काढायचा, चिरडून टाकायचा प्रयत्न अव्याहत सुरू राहिले. त्यासाठी सगळ्याप्रकारची अत्याधुनिक यंत्रणा वापरायची, मग सॅटेलाईटचा वापर असेल किंवा ड्रोनचा वापर असेल. ज्या यंत्रणा उपलब्ध आहेत, त्या सुरक्षा यंत्रणा त्या अत्याधुनिक करायच्या. हे सगळे प्रयत्न झाल्यामुळे दहशतवादाचा बिमोड होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडलेला होता ३७० कलम हटवलं त्यानंतर आपण पाहतोय परिस्थिति बदलली आहे. आज तिकडच्या लाल चौकामध्ये तिरंगा फडकवता येऊ शकतो. पण दहशतवाद्यांना आश्रय देणारे लोक तिथे अजूनही काही प्रमाणात असतीलच. या दहशतवाद्यांना स्थानिकांकडून आश्रय दिला जात होता, कुठे घरांमध्ये, तर कुठे शाळांमध्ये लपण्याची व्यवस्था केली जात होती आणि त्यातून हे दहशतवाद हा मोठ्या प्रमाणात फोफावत होता आणि अशा सगळ्या परिस्थितिमध्ये सरकारने नक्षलवादाच्या बाबत जशी कठोर भूमिका घेतली तशीच दहशतवादाच्या बाबत घेतली. त्यामुळे दहशतवाद नियंत्रणात ठेवण्यासाठी निश्चितपणे फायदा झाला. अर्थात अजूनही सगळी परिस्थिति खूप सुधारलेली आहे अशातला भाग नाही.
पाकिस्तानसारखा देश आपला शेजारी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या अशा पद्धतीच्या षडयंत्रांचा सातत्याने वापर केला जातो. सातत्याने कारस्थानं रचली जातात. त्यांना भारताची प्रगती भारताची उन्नती याविषयी निश्चितपणे जळफळाट आहे त्यातून भारतामध्ये दहशतवादी पाठवून सातत्याने भारतामध्ये अराजक निर्माण करणं, असंतोष निर्माण करणं, भीतीचे वातावरण तयार करणं यासाठी प्रयत्न चालू असतात. पण आता या दहशतवादावर भारत सरकारने पकड मिळवलेली आहे. आपण पाहिलं ८ जुलैला झाकीर गनी म्हणून एक लष्करे तैयबाचा अतिरेक्याला शोपियामध्ये मारण्यात आलं. त्याचा आणखी एक सहकारी अजूनही लपलेला आहे. त्याचाही शोध सुरू आहे. एकूणच एखादा अतिरेकी किंवा दहशतवादी असेल तरी त्याला शोधायचं, परिसर पिंजून काढायचा, कोणतीही ढिलाई करायची नाही. त्यामुळे हे दहशतवादी स्थानिकांकडे आश्रय घेत नाहीत. कारण असा आसरा देणाऱ्या स्थानिकांचे सगळे रसदीचे मार्ग बंद केले जातात. म्हणून हे दहशतवादी आता डोंगर रांगांमध्ये, जंगलांमध्ये लपून राहू लागले आहेत.
हे ही वाचा:
सर्वोच्च न्यायालयात गोंधळ; सरन्यायाधीशांबद्दल अपशब्द, कागद फेकले
‘रॉबर्ट’ आणि ‘मॅटिल्डा’ रोबोट्स अडकले लग्नबंधनात
‘इमानदार मित्रच आयुष्यभर साथ देतात’
कॅन्सर ते डायबिटीस… ३९ महत्त्वाची औषधे आता परवडणाऱ्या दरात!
हे कशामुळे शक्य झालं तर सरकारची दहशतवादाच्या संदर्भात जी नीती आहे त्यामुळेच. १ जुलै २०१५ मध्ये बुऱ्हान वानी हा दहशतवादी होता त्याचा फोटो सगळीकडे व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हातामध्ये अत्याधुनिक बंदुका घेतलेले तरुण होते, लष्करासारखे वेष त्यांनी परिधान केलेला होता. एक प्रकारे सुरक्षा यंत्रणांना आव्हान देण्याचा हा प्रयत्न होता. बुऱ्हान वानीने स्वतःच एक मॉडेल तयार केलं की आम्ही बिनधास्त तुम्हाला चेहरा दाखवू दाखवा आम्हाला पकडून दाखवा आम्हाला मारून. शेवटी २०१६ मध्ये जुलैच्या महिन्यातच बुऱ्हान वानीसह आणखी काही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. तेव्हा काश्मीरमध्ये जनक्षोभ उसळला होता. दहशतवाद्यांना असलेला पाठिंबाच त्यातून दिसत होता.
२०१८ मध्ये पाहायचं झालं तर जवळपास २६६ अतिरेकी काश्मिरात मारले गेले. २०२० मध्ये २३० अतिरेकी मारले गेले यात वर्षी ९४ जवान मारले गेले आणि मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्यांचा आकडा ८८ होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. या चालू वर्षामध्ये जर पाहायचं झालं तर दहा अतिरेकी ते मारले गेलेत. याच चालू वर्षात जवान किती मारले गेले तर अवघा एक जवान. अर्थात तेही दुर्दैवीच आहे. य़ाच चालू वर्षात एकमेव सर्वसामान्य नागरिक मारला गेला. याबद्दल सरकारच कौतुक केलंच पाहिजे. त्याविषयी कोणतेही राजकारण आणता कामा नये. या दहशतवादामुळे आपला देश किती वर्षे पोळून निघाला आहे, हजारो लोकांचे प्राण गमवावे लागले आहेत, हे आपण पाहिलेल आहे.
आता आपण पाहिलं की गुजरात एटीएसने छापेमारी करत आठ अतिरेक्यांना पकडलं, त्यांची लिंक पाकिस्तानशी जोडममोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. आत्ता महाराष्ट्रामध्ये एटीएसने छापेमारी सुरू केली. मुंबईसह वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू आहे त्याच्यामध्ये जवळपास १०० लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. पण दहशतवादाची ही पाळेमुळे शोधण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, तो खूप महत्त्वाचा आहे.
इतकी वर्षे आपल्यावर नक्षलवादाचे सावट होते.नक्षलग्रस्त जिल्ह्यांत कोणत्याही प्रकारच्या सुविधा पोहोचत नव्हत्या, विकास होत नव्हता, विकासाची दिशा त्या जिल्ह्यांना सापडत नव्हती. म्हणूनच दहशतवाद सुद्धा अशाच पद्धतीने संपुष्टात द्यायला हवा आहे. आज जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विकास होत आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची भाषा बदलली आहे. ते विकासाची भाषा करू लागले आहेत. हा सगळा बदलता काळ आपल्याला दिसून येतोय. मध्यंतरी असे व्हिडिओ सुद्धा आले की काही काश्मिरी पंडित पुन्हा आपल्या घरी परतले. त्यांना तिथून हाकलून लावण्यात आलं होतं. त्यांची घरं हिसकावून घेण्यात आली ते पुन्हा एकदा आपल्या मूळ घरी आले. ही परिस्थिती का बदलली तर सरकारची जी नीती आहे, जे धोरण आहे त्यामुळे.
नरेंद्र मोदी ज्यावेळेला परदेशात जातात तेव्हा त्या विविध देशांसोबत झीरो टॉलरन्सची भूमिका मांडली जाते. विविध देशही या भूमिकेशी सहमत आहेत. पाकिस्तानची अवस्था आज आपण पाहात आहोत. पाकिस्तान कसा डबघाईस आलेला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान सरकार विरुद्ध प्रचंड रोष आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे. हे सगळं कशामुळे झालं तर दहशतवादाचा पुरस्कार केल्यामुळे. आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून याच पाकिस्तानला जोरदार तडाखा दिला. दहशतवादी तळ उद्वस्त केले, त्यातून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला.
