मालाड पूर्व येथील कुरार व्हीलेजमध्ये दोन कोवळ्या तरुणींना मारहाण झाली. रिक्षाच्या रांगेत घुसण्यासाठी विरोध केल्यामुळे संतापलेल्या एका मुस्लीम महिलेने एक फोन कॉल करून १० मिनिटात २० ते २५ मुस्लीमांचा मॉब जमवला. त्या दोन तरुणींसह एका तरुणाला बेदम मारहाण झाली. कोणीही ठार झाले नाही, कोणाचेही डोके फुटले नाही, बलात्कार झालेला नाही, म्हणून या घटनेला फुटकळ ठरवले जाईल याची दाट शक्यता आहे. विधानसभेचे सत्र सुरू असूनही हा गंभीर मामला उबाठा शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला उपस्थित करावासा वाटला नाही.
धुरंधर सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर ईदच्या सणाच्या आधी देशातील वातावरण खराब करण्यासाठी हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे, असा जोरदार प्रचार काँग्रेसच्या इको सिस्टीमने केला. या देशाचा इतिहास पाहता मुस्लीम कट्टरवाद्यांना दंगलींसाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. होळीच्या दिवशी रंग उडाला म्हणून दिल्लीत तरुण कुमार नावाच्या दलित तरुणाला जमावाने ठार केले.
बीडमध्ये एका निवृत्त मराठी सैनिकाच्या डोक्यात दंडुका घालून त्याला जबर जखमी केली, कोणती कसर बाकी राहू नये म्हणून त्यांच्या अंगावर उकळता चहा ओतला. मीडीयात एक बातमी आली, फार हो हल्ला झाला नाही. कारण हिंदू सैनिकाला मुस्लीमांनी मारले होते. दलित विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध दलित असा किरकोळ प्रकार असता तर मीडियाने चार दिवस तरी रंगवला असता. मदरशांमध्ये रोज सकाळ संध्याकाळ हिंदू हे काफीर आहेत, त्यांच्या बायका या माल ए गनिमत आहेत, देशात तुम्हाला गझवा ए हिंद करायचे आहे, असे धडे मिळाल्यानंतर अशा घटना होणे स्वाभाविक नाही का ?
कुरार मध्ये झालेला प्रकार धक्कादायक अशासाठी की तो अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुंबई शहरात झालेला आहे. मुस्लीम तरुण आणि महिलांच्या जमावाने एक हिंदू तरुण आणि दोन तरुणींना टोळक्याने घेरून मारहाण केलेली आहे. कट्टरवाद्यांना दंगली घडवण्याची किती खुमखुमी आहे, हे स्पष्ट करणारी ही घटना आहेच, शिवाय हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या राज्यातील सरकारला, राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना हे थेट आव्हान आहे.
हे महिलांमधील किरकोळ भांडण म्हणून झटकून टाकण्याचा प्रयत्न काही लोक करतील. या घटनेत सहभागी असलेले लोक स्वस्तात सुटले तर येत्या काळात महिलांची सुरक्षितता धोक्यात येईल. कारण ही एकाकी घटना नाही. गेल्या वर्षी इथे गुढीपाडव्याच्या दिवशी दंगल सदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा ईदच्या दिवशी झाली. या दंग्याचे केंद्र पठाणवाडी आणि शेजारच्या इस्लामपुरा या वस्तीत आहे.
मालाड पूर्वेला कुरारला जाण्यासाठी शेअर रिक्षा असतात. रिक्षात बसण्यासाठी रांग असते. ही रांग मोडून रिक्षात बसण्यासाठी अंजूम आणि फातिमा अकबर या बुरखाधारी महिला अडून बसल्या होत्या. दंडेली करून या महिला रिक्षात बसून गेल्या. इथे हा विषय संपला असता तरी ठिक होते. परंतु दंडेली करून या महिलांचे मन भरले नाही. त्या रिक्षात बसल्या परंतु घरी गेल्या नाहीत. त्या वाट पाहात होत्या. या तरुणींना रिक्षात बसून मयूर ज्वेलर्स या दुकानासमोर उतरल्या तेव्हा त्यांना या महिला आणि सोबत असलेल्या जमावाने गाठले.
रिक्षातून खेचून या मुलींना बाहेर काढले. आधी देव शहा तरुणाला मारहाण कऱण्यात आली, त्यानंतर त्या महिलांनी त्या तरुणींनाही मारहाण केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षावाल्यालाही मारहाण करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर पोलिसांची भूमिका काय होती हे जाणून घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटनांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिस टाळाटाळ करतात. तक्रारदाराला असे काही तरी करायला सांगायचे जेणे करून ते कंटाळून तक्रार करणार नाहीत, त्यामुळे त्यांना तासंतास बसवून ठेवायचे, क्रॉस एफआयआरची धमकी द्यायची. ही घटना सायंकाळी घडली. घटनेनंतर तक्रारदार आठच्या सुमारास पोलिस ठाण्यात पोहोचल्या. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास रात्री ११.३० वाजता सुरूवात केली.
पोलिसांनी एफआयआर रात्री दीडच्या सुमारास नोंदवण्यात आला. तीन जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुरार पोलिसांनी या टोळक्याच्या विरोधात लावलेली कलमे अत्यंत फुटकळ अशा प्रकारची आहेत. भारतीय न्याय संहिते अंतर्गत कलम ११५(२), १२६(२), १८९(१ आणि २), ३(५), ३५१(२), ३५२, म्हणजे दुखापत, अडवणे, धमकी देणे, गंभीर धमकी देणे, सामुहीक गुन्हा, हल्ला, किरकोळ मारहाण ही कलमे लावली आहे.
घटनेचे गांभीर्य पाहात पोलिसांनी लावलेली कलमे थुकरट म्हणावी लागतील. दोन कोवळ्या मुलींना, एका तरुणाला गाठून जमावाने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. मुस्लीम टोळक्याने हिंदू मुलींना मारहाण केलेली आहे. हा थेट धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रकार आहे, दंगा घडवण्याचा, हत्येचा प्रयत्न आहे, दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्न आहे. परंतु गुन्हेगार आपले नातेवाईक असल्यासारखी कलमे पोलिसांनी लावली आहेत.
या प्रकरणात एक गोष्ट लक्षात घ्या अंजुम आणि फातिमा यांच्या एका फोन कॉलवर १० ते १५ मिनिटाच हा २५ जणांचा जमाव एकत्र झाला. इतकी संख्या इतक्या कमी वेळेत एकत्र आणण्याचे काम एखादी संघटनाच करू शकते. प्रत्येक मोहल्ल्यात असे गट सक्रीय आहेत. जे १० ते १५ मिनिटात एकत्र येऊ शकतात. इस्लामपूरा आणि पठाणवाडी या भागात बंदीच्या आधी पीएफआय़ प्रचंड सक्रीय होती. बंदी घातल्यानंतर पीएफआय़चे नाव घेऊन कोणी काम करत नसले तरी त्या संघटनेशी जोडले गेलेले लोक आजही सक्रीय आहेत.
कुरारमध्ये जे काही घडले तो ट्रेलर आहे. एक फोन कॉल वर २५ जणांचा जमाव एकत्र येतो याचा अर्थ तयारी किती जबरदस्त आहे हे लक्षात येते.
ज्या भागात हा प्रकार घडला तो अशा प्रकारच्या घटनांसाठी कुख्यात आहे. मालाडच्या राणी सती मार्गावर गेल्या वर्षी भगवी वस्त्र घातली म्हणून इथे काही जाळीदार टोपीवल्या जमावाने तरुणांना दंडुके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. या वर्षी ईदच्या काळात त्याची पुनरावृत्ती झाली. तेव्हा पोलिसांनी दंगेखोरांची वरात काढली असती तर कदाचित यावेळी हा प्रकार घडला नसता.
सुदैवाने मयूर ज्वेलर्सचा मालक वेळीच मध्ये पडला त्याने या मुलींनी सुटका केली अन्यथा या मुलींसोबत काहीही बरे वाईट घडले असते. यात दहशत निर्माण करण्याचा हेतू उघड आहे. एक तर रिक्षाच्या रांगेचे नियम पाळायचे नाहीत, नियम पाळले नाही, म्हणून हटकले तर जमाव गोळा करून २०-२२ वर्षाच्या मुलींना मारहाण करायची हा प्रकार म्हणजे निर्ढावलेपणाचे, गुंडगिरीचे लक्षण आहे. पोलिसांना कारवाईसाठी माजी खासदार संजय निरुपम यांना दबाव टाकावा लागतो. आरोपींना अटक व्हावी म्हणून हिंदूंना पोलिस ठाण्यासमोर हनुमान चालीसा वाचावी लागते हे अत्यंत गंभीर आहे.
उबाठाचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी त्या तरुणींच्या घरी भेट दिली कठोर कारवाईचे आश्वासन दिले. बहुधा त्यांच्यातला बाळासाहेबांचा शिवसैनिक जागा झाला असावा. परंतु इतका गंभीर विषय त्यांनी विधानसभेत उपस्थित करावासा वाटला नाही. विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होते. संधी होती. परंतु त्यांनी गप्प राहणे पसंत केले. तिथे मैदानात संजय निरुपम यांना उतरावे लागले. हिंदूंना तिथे पोलिस ठाण्यात एकत्र येऊन हनुमान चालीसाचे सामुहीक पठण करावे लागले. प्रभू अवतरले असते तर कदाचित याची गरज पडली नसती.
पोलिस ठाण्यासमोर मारहाण झाल्यानंतर पुढचे तीन तास एफआयआर करायचा की नाही, याचा पोलिस खल करत बसतात. जमाव जमतोय हे लक्षात आल्यानंतर एफआयआऱ दाखल केला जातो. तरुणींच्या जीविताशी संबंधित असलेल्या या प्रकरणात पोलिसांची चालढकल भूमिका, एफआयआरमध्ये लावण्यात आलेली गुळमुळीत कलमे पाहाता पोलिस या गुन्ह्याच्या मागे जी जिहादी मानसिकता आहे, ती खणून काढण्याचा प्रय़त्न करतील याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा कमजोर एफआयआऱचे परिणाम पुढे गुन्हेगार निर्दोष सुटण्यात होतात.
हे ही वाचा:
पाक सुपर लीगमधील विदेशी खेळाडू वाऱ्यावर
पाकिस्तान सुपर लीगला युद्धाचा फटका; स्पर्धा फक्त दोन शहरांपुरती मर्यादित
२० लाख अमेरिकन डॉलर्स मोजा आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज घेऊन जा!
कुरारचे पोलिस वपोनि उमेश पाटील पत्रकारांना सांगतायत की आम्ही दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तरुण मुलींच्या अंगाला मुस्लीम गुंडांनी हात लावलाय, परंतु यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला हवा होता, अशी आठवण तक्रारदारांना करावी लागली. सीसीटीव्ही फूटेज हाती असून सुद्धा पोलिसांना ही बुद्धी झाली नाही. आऱोपींच्या विरोधात लावण्यात आलेल्या कमलांपैकी फक्त ३(५) हे कलम अजामीनपात्र आहे.
रोग प्रकटण्याच्या आधी रोगाची लक्षणे दिसतात. कुरार मध्ये घडलेला हा प्रकार म्हणजे रोगाची लक्षणे आहेत. याप्रकरणात अटक करण्यात आलेले इद्रीस गुलाबनबी सुरती, साहील, इम्पियाज यांचे रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. इथे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा दरारा दाखवला नाही तर ही जिहादी गॅंग उपनगरात एखादा मोठा दंगा घडवल्याशिवाय राहणार नाही.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







