24 C
Mumbai
Monday, March 2, 2026
घरसंपादकीयमोदींनी ट्रम्पना एरंडेल पाजले; ल्युटनिक गुडघ्यावर भारतात आले...

मोदींनी ट्रम्पना एरंडेल पाजले; ल्युटनिक गुडघ्यावर भारतात आले…

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कितीही ओरडा करीत असले, जगाला धमकावत असले, तरी भारत कोणाची दादागिरी सहन करण्याच्या मन:स्थितीत नाही. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टेरिफविरुद्ध निकाल दिल्यानंतर पिसाळलेल्या ट्रम्प यांनी जगातील सर्व देशांच्या विरोधात सरसकट १० टक्के जादा टेरीफ लावले. त्यानंतर भारताने व्यापार कराराबाबत वाटाघाटी रद्द केल्या. गेल्या काही दिवसात भारताने दिलेल्या दणक्यानंतर अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हावर्ड लुटनिक गुडघ्यावर  आले आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेने जेव्हा भारतावर ५० टक्के टेरीफ लावण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा हेच ल्युटनिक म्हणाले होते.  ‘मोदी शरणागती पत्करतील, ट्रम्प यांना सॉरी म्हणतील.’

ल्युटनिक काल गुरुवारी भारतात दाखल झाले. त्याच दिवशी जेव्हा ट्रम्प प्रशासनाने भारताच्या सौर उपकरणांवर १२६ टक्के टेरीफची घोषणा केली होती. ल्युटनिक यांच्यासोबत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गिओ गोर यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर ल्युटनिक आणि गोर यांच्यासोबत व्यापार आणि आर्थिक भागीदारी वाढण्यासाठी फलदायी चर्चा झाली, अशी पोस्ट गोयल यांनी टाकली. गोर यांनीही अशीच पोस्ट केलेली आहे.

भारतीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तावरून एक गोष्ट स्पष्ट आहे. ल्युटनिक यांचा दौरा पूर्व नियोजित नव्हता. ते वैयक्तित भेटीवर आले होते, अशी माहिती एका भारतीय अधिकाऱ्याने दिली आहे. दौरा वैयक्तिक होता तर ते गोयल यांना का भेटले हा प्रश्न शिल्लक उरतोच. भर उन्हाळ्यात ल्युटनिक हिंडाफिरायला भारतात यावे इतके काही त्यांचे घट्ट संबंध नाहीत.

टेरीफबाबत अमेरिकेच्या धोरणाबाबत अधिक आल्यानंतर अमेरिकेशी व्यापार करारावर चर्चा सुरू होईल, असे गोयल यांनी सांगितले आहे. याचा अर्थ याबाबत अमेरिकेचा भोंगळपणा आणि तळ्यात मळ्यात संपल्याशिवाय चर्चा करण्याची भारताची तयारी नाही.

हे ही वाचा:

वसई- विरार महापालिकेत आता भाजपचा आवाज घुमणार!

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी

भारताची तिसऱ्या तिमाहीत ७.८% जीडीपी वाढ

भोपाळमध्ये मंदिरांच्या बाहेर मांसाचे तुकडे फेकत होती मुस्लिम महिला

भारताने ट्रम्प यांच्या टगेगिरीला अनुल्लेखाने मारण्याचा प्रय़त्न केला. परंतु मौनाची भाषा, शिष्टाचाराची ट्रम्प यांना समजत नाही, हे भारताच्या लक्षात आले. ट्रम्प हे लातो के भूत आहेत, हे स्पष्ट झाल्यानंतर भारताने आता तीच भाषा वापरायला सुरूवात केली आहे.

भारताने पहिला दणका दिला म्युनिक सुरक्षा परिषदेत. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान वेडपूल यांच्या सोबत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर  यांचे एक सत्र होते. त्यात रशियन तेलाबाबत उत्तर देताना म्हणाले, तेलाची खरेदी उपलब्धता, किंमत आदी बाबींचा विचार करून तेल कंपन्या त्यांच्या दृष्टीने उत्तम पर्यायाचा विचार करत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रश्नकर्त्याला त्यांनी सांगितले, ‘तुम्ही जे विचारताय त्याचा अर्थ जर आम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो का? अशा तुमच्या विचारांशी सहमत होणार नाही अशा प्रकारची निवड करू शकतो का? असा असेल तर त्याचे उत्तर हो असे आहे.’ जयशंकर यांनी पुन्हा एकदा गोऱ्यांना एरंडेल पाजलेले आहे.

ते जे काही म्हणाले आहेत ते अमेरिकेचा माज उतरवणारे आहे. कारण त्याच म्युनिक सुरक्षा परिषदेत अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो म्हणाले होते की, ‘भारताने रशियन तेल खरेदी करणार नाही, असा आम्हाला शब्द दिलेला आहे’. तिथल्या तिथेच भारताने अमेरिकेचे म्हणणे फेटाळले. ट्रम्प यांना जागा दाखवली. हिंदीत याला भाड मे जाओ, असे म्हणतात.

ही तर सुरूवात होती. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या टेरीफ विरोधी निकालानंतर ट्रम्प यांनी जी आदळआपट केली, त्यावरून भारताच्या लक्षात आले की, ट्रम्प यांच्याशी वाटाघाटी करण्यात काहीही अर्थ नाही. न्यायालयाच्या निकालाची आपण पर्वा करत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी सेक्शन १२२ चा वापर करून त्यांनी जगातील देशांवर १० टक्के अतिरिक्त टेरीफ लावलेच, शिवाय, ‘आणखी टेरीफ लावता येईल अशा कायदेशीर तरतुदींचा शोध घ्य, असा आदेश त्यांना प्रशासनाला दिला. व्यापार करार झाल्यानंतर सुद्धा हे दुखणे कमी होणारे नाही , हे भारताच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता आपण ताणून धरतो आहोत. २२ फेब्रुवारी रोजी वाटाघाटींसाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला. पुढचे वेळापत्रक भारताने जाहीर केले नाही. याचा अर्थ वाटाघाटी आता भारताच्या वतीने अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.

हे दोन दणके अशा प्रकारे बसले की आता अमेरिकेच्याही लक्षात आलेले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. ट्रम्प यांना हेही दिसते आहे की, एआय इम्पॅक्ट परीषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांच्यासह १८ देशांचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते. शंभरावर देशांचे प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी झाले होते. गेल्या काही महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उरसूला वॉन डेर लेन, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्व्हा भारतात येऊन गेले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारतात दाखल होणार आहेत. इस्त्रायलमध्ये भारताचे जंगी स्वागत झाले. भारताने युके, युरोपियन युनियन, सोबत मुक्त व्यापार करार केलेला आहे. इस्त्रायल सोबत बोलणी सुरू आहेत. टेरीफ लादून आपण भारताचे काहाही वाकडे करू शकलो नाही. भविष्यात तर अजिबातच करू शकणार नाही.

अमेरिकी न्यायायलाच्या निकालानंतर ‘आय कॅन डीस्ट्रॉय ट्रेड, आय़ कॅन डीस्ट्रॉय कण्ट्रीज…’ अशी दर्पोक्ती ट्रम्प यांनी केली होती. त्यांच्या धोरणामुळे अमेरिकेचाही बाजार उठतो आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमेरिकेचा व्यापार तोटा विक्रमी १.२ ट्रिलियन डॉलरपर्यंत गेला आहे. टेरीफ लादून ना त्यांचे भले झाले, ना जगाचे.

कधी काळी अमेरिकेचे पिट्ठू असलेले युरोपातील देश, कॅनडा, ऑस्ट्रेलिया ट्रम्प यांच्यामुळे दुखावले आहेत. जगात वेगळ्या पर्यायांच्या शोधात आहेत. अनेकांना भारत हाच मजबूत पर्याय म्हणून दिसतो आहे. इस्त्रायल सारखा समर्थ देश त्याच वाटेने जाताना दिसतो आहे. परंतु ट्रम्प यांचा वेडाचार थांबताना दिसत नाही.

ल्युटनिक यांनी भारताच्या विरोधात अनर्गल विधाने केलेली आहेत. टेरीफ लादल्यानंतर ‘दोन महिन्यात मोदी शरण येतील, ट्रम्प यांना सॉरी म्हणतील, परंतु त्यांना माफ करायचे की नाही याचा निर्णय ट्रम्प घेतील’. असे विधान त्यांनी केले होते.

ते असेही म्हणाले होते की, ‘व्यापार कराराबाबत सगळे काही ठरले होते. मोदींनी ट्रम्प यांना एक फोन क़ॉल करण्याची गरज होती, परंतु मोदींनी फोन कॉल केला नाही. त्यामुळे ट्रेड डील झाले नाही’.

व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी तर मर्यादाच ओलांडली. ‘रशियन तेलामुळे फक्त ब्राह्मणांचा फायदा होतो आहे’. म्हणजे तेलाच्या मुद्द्यावरून भारतात जातीय आग पेटवण्याचा प्रयत्न अमेरिका करत होती. तरीही ट्रम्प वर तोंड करून ‘मोदी इज माय फ्रेण्ड’ असे सतत म्हणत होते.

भारताने या तमाशाला आतापर्यंत कृतीने उत्तर दिले आहे. ट्रम्प, रुबियो यांनी वारंवार सांगितले, परंतु भारत रशियाकडून तेल खरेदी करतच राहीला. यापुढेही करेल. भारताने आता व्यापार करारही खुंटीला बांधून ठेवण्याचे संकेत दिले आहेत. जर तुम्हाला गरज नसेल तर आम्हालाही नाही. भारताशिवाय अमेरिकेचे चालू शकते, तर आम्हीही अमेरिकेशिवाय चालवून घेऊ ही भारताची स्पष्ट भूमिका आहे.

ल्युटनिक भारतात आले. त्यांना कोणीही आमंत्रण पाठवलेले नव्हते. कोणत्याही कार्यक्रमात ते सहभागी होणार नव्हते. कोणतीही बैठक नव्हती. ते अचानक आले. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गिओ गोर यांच्यासोबत ते वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना भेटायला गेले. पियूष गोयल यांनी त्यांना व्यवस्थित खाऊपिऊ घातले. दोघांसोबतचे फोटो त्यांनी एक्सवर शेअर केले. सुस्पष्टता असेल तेव्हा चर्चा करू हे त्यांना तोंडावर सुनावले.

जेव्हा जेव्हा ट्रम्प अडचणीत येतात तेव्हा ते मोदींना गूळ लावण्यासाठी भारतात त्यांचा माणूस पाठवतात. काही दिवसांपूर्वी सर्गिओ गोर असेच भारतात दाखल झाले, त्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन केला होता. आता ल्युटनिक आले आहेत. अमेरिकेची बुडती अर्थव्यवस्था पाहाता येत्या काळात ट्रम्प आले तर नवल वाटून घेऊ नका.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा