27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरसंपादकीयट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय?

ट्रम्प मोदींच्या विरोधात तोच जुना खेळ खेळणार काय?

Google News Follow

Related

जगाच्या राजकारणावर पकड ठेवण्याच्या खुमखुमी मागे, आपला खजिना भरवा ही प्रेरणा असते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सगळे दबावतंत्र त्याचसाठी सुरू आहे. भारताने रशियाकडून तेल विकत घेणे बंद केले, असे मी ऐकले असल्याचे ट्रम्प काल म्हणाले होते. जे काही त्यांनी ऐकले ते चुकीचे असल्याचे भारताने अजिबात वेळ न दवडता स्पष्ट केलेले आहे. म्हणजे भारत सुद्धा आता पूर्णपणे भिडण्याच्या मूडमध्ये आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बधत नाही, ऐकत नाहीत, त्यामुळे ट्रम्प यांचे सरकार अमेरिकेचा जुना खेळ भारतासोबत खेळणार काय? तोच खेळ जो माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या डेमोक्रॅट्स सरकारने अनेक देशात खेळला होता.

भारत अमेरिकेच्या दबावामळे रशियाशी फारकत घेण्याची शक्यता शून्य. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांना मोदींनी भारतभेटीचे निमंत्रण दिले असून पुतीन यांनी ते स्वीकारले आहे. ते सप्टेंबर ते डिसेंबर या काळात भारतभेटीवर येतील अशी शक्यता आहे. या भेटीत भारत रशियाचे द्विपक्षीय संबंध घट्ट होतील, अशी अपेक्षा आहे. व्यापार आणि संरक्षण क्षेत्रात मोठे करार होणे अपेक्षित आहे. ट्रम्प यांच्या दमदाटीचा उलट परिणाम होताना दिसणार आहे. भारताने त्याचे ठोस संकेत द्यायला सुरूवात केलेली आहे.

भारताने रशियाकडून तेल विकत घ्यायचे बंद केले असल्याचे ऐकले या ट्रम्प यांच्या टीप्पणीला भारताने चोख उत्तर दिले आहे. ‘भारतीय रिफायनरींनी रशियाकडून तेल विकत घेणे सुरू ठेवलेले आहे. तेलाचे भाव, दर्जा, आमच्याकडे असलेल्या तेलाचा साठा आणि अन्य आर्थिक घटकांवर आमची तेलखरेदी अवलंबून असते’, असे भारताने स्प्ष्ट केलेले आहे. भारताची भूमिका स्वच्छ आहे. रशिया हा जगातील दुसरा मोठा तेल उत्पादक आहे, निर्यातदार आहे. रशियाला तेल बाजारातून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा एकदा २०२२ सारखी परीस्थिती उद्भवेल आणि तेलाचे दर प्रति बॅरल १३७ डॉलरपर्यंत जातील, अशी चिंता भारताने व्यक्त केलेली आहे. सध्या तेलाचा दर ६७ डॉलर प्रति बॅरल म्हणजे २०२२ च्या तुलनेत जवळजवळ निम्मा.

भारताच्या तेल खरेदीवरून ट्रम्प बिथरले आहे. त्यांनी इंडीया इज डेड इकॉनॉमी असे जाहीर केले आहे. त्यांचे मंत्री आक्रस्ताळी भारतविरोधी विधाने करतायत. ट्रम्प हे प्रचंड अहंकारी आहेत, मोदी त्यांचा अहंकार कुरवाळणे तर दूर त्यांच्या अहंकारावर थयथय नाचतायत. त्याच संतापातून भारतावर २५ टक्के टेरीफ लादण्याची घोषणा केल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय सात दिवस पुढे ढकलला आहे. त्यांचे सगळेच वर्तन अनाकलनीय आहे. येत्या काळात मोदी-ट्रम्प यांच्यात समेट झाला नाही, भारत-अमेरिकेचे संबंध सुरळीत झाले नाहीत, तर अशा परिस्थितीत ट्रम्प अमेरिकेचा जुना खेळ खेळण्याची शक्यता आहे. जो बायडन प्रशासनाच्या काळात मोठ्या प्रमाणात सुरू होता. डोनाल्ड लू या अमेरिकी मुत्सद्याचा वापर करून पाकिस्तान, बांगलादेशसह अनेक देशांत सत्तापालट करण्याचा यशस्वी प्रयोग अमेरिकेने राबवला. पाकिस्तानमध्ये तर दिखाऊ निवडणुका तरी झाल्या. परंतु, बांगलादेशातील सत्तापालट तर अत्यंत रक्तरंजित होता.

मोहम्मद यूनस नावाचे बाहुले सत्तेवर बसवण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भारतातही असेच काही तरी करण्याचा प्रयत्न झाला. मोदींना पाडण्यासाठी अमेरिकेच्या डीप स्टेटने जोर लावला होता. ओपन सोसायटी या एनजीओचे सर्वेसर्वा उद्योगपती जॉर्ज सोरोस यांनी मोदी सरकार पाडण्यासाठी १ अब्ज डॉलर खर्च कऱण्याची घोषणा केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी या सोरोस यांचीच पालखी वाहात होते.

सोरोस यांच्या ओपन सोसायटीने पोसलेल्या ऑर्गनाईज्ड क्राईम एण्ड करप्शन रिपोर्टीग प्रोजेक्ट या वृत्तसंस्थेने एखादाअहवाल प्रसिद्ध केला रे केला की राहुल गांधी लगेचच त्यावर ओरड सुरू करत. सोरोस हे डीप स्टेट्सचे प्यादे होते, ही बाब तर आता पुरेशी उघड झालेली आहे.

बायडन सरकार पाय उतार झाल्यानंतर बंद झालेल्या स्पॉन्सर्ड पत्रकार परिषदा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. इंडिया इज डेड इकोनॉमी हे ट्रम्प यांचे वाक्य राहुल गांधी यांनी उचलले, डोक्यावर घेतले, मोदी सरकारच्या विरोधात वापरले. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मी मध्यस्ती केली, ‘या युद्धात पाच लढाऊ विमाने पडली’, असे ट्रम्प यांचे काही गौप्यस्फोट वापरून राहुल गांधी यांनी मोदींच्या विरोधात शरसंधान केले आहे. राहुल गांधी वारंवार ट्रम्प यांना संकेत देत आहेत, जर तुम्हाल माझ्या सेवेची गरज असेल तर मी उभा आहे. मी आपल्यासाठी काहीही करायला तयार आहे. मोदी जर ट्रम्प यांच्या धमक्यांना बधले नाहीत, तर राहुल गांधी यांना कडेवर घ्यायला ट्रम्प तयार होतील. ते सत्तेसाठी काही करू शकतात हे ट्रम्प यांना ठाऊक आहे. युपीए सरकारच्या काळात चीनी कम्युनिस्ट पक्षाशी करार केल्यानंतर गांधी कुटुंबियांनी सत्ताकाळात चीनची ज्या प्रमाणे काळजी घेतली, आजही ते घेत आहेत, तशीच काळजी ते अमेरिकेची घेतील याबाबत ट्रम्प यांच्या मनात संशय नाही. राहुल गांधी देखील भारताचे मोहम्महद यूनस व्हायला तयार आहेत.

राहुल गांधी यांनी त्या दिशेने त्यांनी प्रय़त्न सुरू केलेले आहेत. भारताच्या जनतेचा लोकशाहीवर विश्वास उडावा म्हणून ते कामाला लागलेले आहेत. सातत्याने घटनात्मक संस्थांना ते लक्ष्य करतायत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला एक वर्ष उलटून गेले तरीही या निकालांवर संशय निर्माण व्हावा असे प्रयत्न ते सातत्याने करतायत. निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात मतदार अचानक वाढवण्यात आले, असे बिनबुडाचे आरोप ते वारंवार करतायत. बिहारमधून निवडणूक आयोगाने सुमारे ६७ लाख बोगस मतदार, मतदार यादीतून वगळले, त्या मुद्द्यावरही त्यांनी आकांडतांडव केले. आमचे सरकार आले तर बघून घेऊ अशा धमक्या ते निवडणूक आय़ोगाच्या कर्मचाऱ्यांना देत आहेत.

एकूणच मोदी २०२४ ची निवडणूक घपला करून जिंकले, अशी थिअरी शिजवण्याचा ते प्रय़त्न करतायत. एकदा का मोदींना जनसमर्थन नाही हे रुजवण्यात त्यांना यश आले की, आंदोलनाच्या नावाखाली अराजक निर्माण करायला ते मोकळे होतील. अशा परिस्थितीत अमेरिकी पैसा, अमेरिकेने पोसलेले एनजीओ आणि अमेरिकी डीप स्टेटचे समर्थन राहुल गांधींना मिळाले तर मोदींची सत्ता उखडून फेकता येईल, असे हे सगळे गणित आहे.
असे काही प्रयत्न सुरू नसतील असे मानण्याचे काही कारण नाही. मोदी वाकत नसतील तर त्यांना हटवण्याचे प्रय़त्न अमेरिका निश्चितपणे करेल. राहुल गांधी त्यांना मदत करायला एका पायावर उभे राहतील. फक्त यात काही अडथळे आहेत. या कामी ज्या एनजीओंचे बळ डीप स्टेट्सना मिळत होते, त्या एनजीओंची रसद मोदी सरकारने गेल्या काही वर्षात बंद केली आहे. त्यांच्यावर सरकारची बारीक नजर आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रचंड सतर्क आहेत. २०२४ च्या निवडणुकीत दाखवलेला फाजील आत्मविश्वास ते २०२९ च्या निवडणुकीत दाखवण्याची शक्यता शून्य आहे. २०२४ च्या निवडणुकीत संघ फारसा सक्रीय नव्हता. महाराष्ट्र, हरीयाणा, निवडणुकांमध्ये ही परीस्थिती बदलली. संघाने भाजपाच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली. तेच चित्र २०२९ मध्ये पाहायला मिळेल.एक मात्र नक्की येत्या काळात पुन्हा एकदा देशात मोठ्या संख्येने अराजक सदृश्य परीस्थिती निर्माण कऱण्याचे प्रय़त्न होतील. जातीय दंगली, आंदोलने या माध्यमातून पुन्हा एकदा देश पेटवण्याचे प्रय़त्न होतील. देशावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी सतर्क राहावे असा हा काळ असेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा